मुंबई - यंदाचा अर्थसंकल्प (बजेट) येत्या सोमवारी १ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत सादर करतील. या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांच्या काय अपेक्षा आहेत. त्यांना कसा अर्थसंकल्प अपेक्षित आहे, जाणून घेण्यासाठी अर्थतज्ज्ञ पंकज जैस्वाल यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी..
Budget 2021 : जाणून घ्या कसा असेल केंद्रीय अर्थसंकल्प - अर्थसंकल्प २०२१
यंदाचा अर्थसंकल्प (बजेट) येत्या सोमवारी १ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत सादर करतील. या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांच्या काय अपेक्षा आहेत. त्यांना कसा अर्थसंकल्प अपेक्षित आहे, जाणून घेऊयात अर्थतज्ज्ञांची मते..
उद्या सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडून सर्वच क्षेत्राला अपेक्षा आहेत. पण कोरोना काळानंतर सर्व क्षेत्राला केंद्र सरकार कसं खुश ठेवणार. सामान्य माणसाला दिलासा कसा देणार, यासाठी अर्थतज्ज्ञ पंकज जैस्वाल आणि मुंबई उपनगर व्यापारी संघटना अध्यक्ष संजय श्रीवास्तव यांची मते जाणून घेतली. अर्थतज्ज्ञ पंकज जैस्वाल यांच्या मतानुसार अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून सर्व क्षेत्राला दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केलं. तसेच शेतकऱ्यांना दिलासा सेण्यासाठी शेतीविषयक नवीन इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यावर या बजेटमध्ये प्रयत्न करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच सामान्य माणूस कोरोना काळात आर्थिक विवंचनेत असल्याने त्यांना मोठा दिलासा देण्याचा देखील प्रयत्न केला जाईल. कोरोनामुळे सर्वसामान्यांना आरोग्याची काळजी घेण्याचे महत्व समजले असल्याने स्वास्थ क्षेत्रात केंद्र सरकारकडूनही नवीन घोषणा केली जाण्याची शक्यता पंकज जैस्वाल यांनी वर्तवली आहे.
तसेच सरकारने थेट सामान्य नागरिक किंवा व्यापाऱ्यांच्या खिशाला कात्री न लावता सरकारने मोठ्या नवीन सुविधा उवलब्ध करून देऊन त्यावर करप्रणाली तयार करण्याची गरज आल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
छोट्या व्यापाऱ्यांना बजेटकडून अपेक्षा -
कोरोना काळात सर्वात जास्त फटका छोट्या व्यापाऱ्यांना बसला असून छोट्या व्यापाऱ्यांसाठी करात मोठी सूट मिळणे आवश्यक असल्याचे मत मुंबई उपनगर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संजय श्रीवास्तव यावी व्यक्त केलं. कोरोना काळात छोटे व्यापारी आणि त्या व्यापारावर आधारित असलेल्या कामगारांचे हाल झाले असून त्यांना दिलासा मिळावा, यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून आशा आहेत. तसेच या कठीण काळात कसाबसा उभा राहिलेला व्यापाऱ्याला आता सरकारच्या मदतीची गरज असल्याचं सांगत या अर्थसंकल्पाकडून मोठ्या आशा असल्याचं त्यांनी सांगितलं.