महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

BUDGET 2019: थोड्याच वेळात अर्थसंकल्प होणार सादर; गुंतवणूकदारांचे लक्ष मुंबई शेअर बाजारावर - शेतकरी

दरम्यान, या अर्थसंकल्पात प्राप्तीकर सवलतीसह शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या पॅकेजच्या घोषणांचा समावेश होईल, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी फेब्रुवारीमध्ये अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. त्यानंतर आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण संसदेत पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

मुंबई शेअर बाजार

By

Published : Jul 5, 2019, 9:56 AM IST

Updated : Jul 5, 2019, 10:39 AM IST

मुंबई- आज केंद्र सरकारचा अंतरिम बजेट सादर होणार आहे. या अर्थसंकल्पाचा मुंबई शेअर बाजारावरही मोठ्या प्रमाणात परिणाम दिसून येणार आहे. त्यामुळे सर्वच गुंतवणूकदारांचे लक्ष आजच्या अर्थसंकल्पाकडे लागून राहिले असणार आहे. बजेट सादर होताच शेअर बाजार उसळी घेणार की गडगडणार हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.

दरम्यान, या अर्थसंकल्पात प्राप्तीकर सवलतीसह शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या पॅकेजच्या घोषणांचा समावेश होईल, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी फेब्रुवारीमध्ये अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. त्यानंतर आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण संसदेत पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

हा अर्थसंकल्प विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आल्याने आता केंद्रातील सरकार ज्या ज्या राज्यात विधानसभा निवडणुका आहेत. त्या संबंधित राज्यातील मतदारांना खुश करण्यासाठी घोषणांचा पाऊस करण्याची शक्यता आहे. केंद्रातील बजेट जनहित साधणारे असावे या दृष्टीने हे सरकार आजचा अर्थसंकल्प सादर करेल अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

Last Updated : Jul 5, 2019, 10:39 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details