महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

बॉलिवूड स्टार्सना अर्जुन रामपालच्या मैत्रिणीचा भाऊ परदेशातून ड्रग्ज मिळवायचा, व्हॉट्सअ‍ॅप चॅटवरून खुलासा - एनसीबी न्यूज

बॉलिवूड स्टार्सना अर्जुन रामपालच्या मैत्रिणीचा भाऊ परदेशातून ड्रग्ज मिळवायचा. व्हॉट्सअ‍ॅप चॅटवरुन हा मोठा खुलासा झाला आहे.

ncb
अर्जुन रामपालच्या मैत्रिणीचा भाऊ

By

Published : Dec 17, 2020, 4:55 PM IST

मुंबई - बॉलिवूड स्टार्सना अर्जुन रामपालच्या मैत्रिणीचा भाऊ परदेशातून ड्रग्ज मिळवायचा. व्हॉट्सअ‍ॅप चॅटवरुन हा मोठा खुलासा झाला आहे. एनसीबीच्या एका अधिकाऱयाच्या म्हणण्यानुसार, अ‍ॅगिसिलोस याला ड्रग्जच्या संबंधात अटक झाल्यानंतर चौकशीसाठी मोबाईल फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आले होते. फॉरेन्सिक टीमने त्याचे व्हॉट्सअॅप चॅट परत मिळवले, ज्यामुळे हा खुलासा झाला.

व्हॉट्सअ‌ॅप चॅटवरील महत्त्वाचे खुलासे

फॉरेन्सिक टीमने व्हॉट्सअ‍ॅप चॅट परत मिळवल्यानंतर त्या चॅट्सची तपासणी झाली. यानंतर नजीकच्या एनसीबी ऑफिस यांना कळले की, कोलंबिया, दक्षिण आफ्रिकन, ऑस्ट्रेलियन, दक्षिण कोरियन ड्रग्स पेडलर्सच्या संपर्कात अ‍ॅगिसिलोस आंतरराष्ट्रीय ड्रग सिंडिकेटशी संबंधित आहे. त्याचवेळी, तपासणी दरम्यान असेही समोर आले की, जेलिओसच्या संपर्कात बॉलिवूड इंडस्ट्रीशी संबंधित अनेक सेलिब्रिटी होते. त्यांच्या आवडीनुसार तो ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि कोलंबियामधून औषधे विकत घेऊन त्या चांगल्या किंमतीला विकून खूप पैसे कमवत असे.

ABOUT THE AUTHOR

...view details