महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ASHADHI WARI 2021: "बा पांडुरंगा, शेतशिवारात समृद्धी येऊ दे, कोरोनाचे संकट दूर कर" उपमुख्यमंत्र्यांनी घातले साकडे - पायी वारी सोहळा

"यंदा राज्यात पाऊसपाणी चांगलं होऊ दे. माझ्या राज्यातला बळीराजा सुखी होऊ दे. त्याच्या शेतशिवारात, घरात धनधान्याची, दुधदुभत्याची समृद्धी येऊ दे. बा पांडुरंगा, जगावर आलेले कोरोनाचे संकट लवकर दूर कर. सर्वांना निरोगी, सुखी, समाधानी, आनंदी ठेव" असे साकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पांडुरंगाला घातले आहे.

"बा पांडुरंगा, शेतशिवारात समृद्धी येऊ दे, कोरोनाचे संकट दूर कर"  उपमुख्यमंत्र्यांनी घातले साकडे
"बा पांडुरंगा, शेतशिवारात समृद्धी येऊ दे, कोरोनाचे संकट दूर कर" उपमुख्यमंत्र्यांनी घातले साकडे

By

Published : Jul 19, 2021, 7:27 PM IST

Updated : Jul 23, 2022, 11:59 AM IST

मुंबई : "यंदा राज्यात पाऊसपाणी चांगलं होऊ दे. माझ्या राज्यातला बळीराजा सुखी होऊ दे. त्याच्या शेतशिवारात, घरात धनधान्याची, दुधदुभत्याची समृद्धी येऊ दे. बा पांडुरंगा, जगावर आलेले कोरोनाचे संकट लवकर दूर कर. सर्वांना निरोगी, सुखी, समाधानी, आनंदी ठेव" असे साकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पांडुरंगाच्या आणि माता रुक्मिणीच्या चरणी घातले. आषाढी एकादशीच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंढरपूर येथे सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. यावेळी समस्त वारकरी बांधवांना, राज्यातील नागरिकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छाही त्यांनी दिल्या.

समाजातले सगळे भेदाभेद नष्ट होऊ दे
आषाढी एकादशीनिमित्त दिलेल्या संदेशात उपमुख्यमंत्र्यांनी, महाराष्ट्राची संत परंपरा, पांडुरंग भक्तीचा वसा आणि वारसा पुढे नेणाऱ्या तमाम वारकऱ्यांनाही वंदन केले आहे. समाजातले सगळे भेदाभेद नष्ट करुन, बा पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीने, सर्वांना एकत्र, समानतेच्या पातळीवर आणणारी पांडुरंग भक्तीची, पंढरपूरवारीची परंपरा आपले आध्यात्मिक, सांस्कृतिक वैभव आहे. हे वैभव सांभाळून पुढच्या पिढीकडे द्यायचे आहे. बा पांडुरंगाच्या कृपेने कोरोनाचं संकट लवकरच संपेल आणि आपण सर्वजण वारीने पंढरपूरला जाऊ शकू, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

Last Updated : Jul 23, 2022, 11:59 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details