महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Breaking news live page 3 June 2022;अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्याकडून निवडणुकीमध्ये मतदाना करिता परवानगी अर्ज दाखल

Breaking news live page 3 June 2022
Breaking news live page 3 June 2022

By

Published : Jun 3, 2022, 9:53 AM IST

Updated : Jun 3, 2022, 7:25 PM IST

19:22 June 03

अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्याकडून निवडणुकीमध्ये मतदाना करिता परवानगी अर्ज दाखल

माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांच्याकडून राज्यसभा निवडणुकीमध्ये निवडणुकीमध्ये मतदाना करिता परवानगी मागणारा अर्ज दाखल करण्यात आला आहे. 6 जून रोजी यावर सत्र न्यायालयात होणार सुनावणी होणार आहे. राज्यसभेच्या 6 जागेकरिता 10 जून रोजी मतदान होणार आहे.

17:53 June 03

वीज पुरवठा खंडित झाल्याने व्हेंटिलेटर वरील रुग्णाचा मृत्यू

वीज पुरवठा खंडित झाल्याने व्हेंटिलेटर वरील रुग्णाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरातील उचगाव मधे घडली आहे. महावितरणच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांचा भरपावसात सीपीआर रुग्णालयाच्या आवारात ठिय्या दिला.

17:18 June 03

दीड कोटीच्या खंडणीला वैतागून लातूरात डॉक्टरची आत्महत्या

बनावट रेमडिसीविर इंजेक्शन प्रकरणी दाखल गुन्ह्यातील अर्ज मागे घेण्यासाठी दिड कोटी रुपयांची खंडणी मागुन, जिवे मारण्याची धमकी एका डॉक्टरला देण्यात आली होती या तगाद्याला वैतागुन उदगीर तालूक्यातील मौजे खेर्डा येथील डॉ. नामदेव गिरी या डॉक्टरने आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी मयत डॉक्टरच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरुन वाढवणा पोलिसांत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

14:07 June 03

नरेंद्र मेहता यांना मुंबई उच्च न्यायालयाचा अंतरिम दिलासा

नरेंद्र मेहता यांना मुंबई उच्च न्यायालयाचा अंतरिम दिलासा

मुंबई - मिरा भाईंदर भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांना मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा दिला आहे. 15 जूनपर्यंत अटक करु नये असे मुंबई उच्च न्यायालयाने निर्देश दिलेत. कथित बेहिशोबी मालमत्तेच्या प्रकरणात ठाण्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्यावर आणि त्यांच्या पत्नीवर 19 मे रोजी गुन्हा दाखल केला आहे. मेहता यांनी 8 कोटी पेक्षा जास्त रकमेची बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी हा गुन्हा दाखल केला आहे.

13:51 June 03

मोहन भागवत यांची भूमिका योग्यच - रामदास आठवले

पुणे - मोहन भागवत यांची भूमिका योग्यच आहे. प्रत्येकाने आपला इतिहास उखडून काढण्याची गरज नाही. मुस्लिम देखील आपले बांधव आहेत. त्यांच्या भावनांचा विचार करणे गरजेचे आहे असे रिपब्लिकन नेते रामदास आठवले स्पष्ट केले आहे.

13:13 June 03

भोंग्याबाबत पत्र वाटणाऱ्या मनसैनिकांची धरपकड

मुंबी - भोंग्याबाबत पत्र घरोघरी वाटणाऱ्या मनसैनिकांची धरपकड. पत्रकं वाटणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. घाटकोपर पोलिसांनी कारवाई केली. महादेवाच्या मंदिरात पत्रक ठेवून कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या पत्राची पूजा केली त्यानंतर या पत्रकांच वाटप सुरू झालं. मनसे कार्यकर्ते पत्रकाचे वाटप घरोघरी करत असताना पोलिसांनी कारवाई केली.

10:42 June 03

चित्रपट काढण्यापेक्षा कश्मिरी पंडितांचे प्राण कसे वाचवता येतील ते बघणे गरजेचे - संजय राऊत

मुंबई - आजही कश्मीरमध्ये दोन जणांची हत्या करण्यात आली, याबद्दल शिवसेना नेते संजय राऊत यांनी चिंता व्यक्त केली. मंदिरावर संघर्ष करण्यापेक्षा कश्मिरी पंडित यांचे प्राण कसे वाचवता येतील ते बघणे गरजेचे आहे असे ते म्हणाले. 370 कलम हटवले, कश्मीर फाईल चित्रपट आणला त्याने कश्मीर पंडिताचे काय भले झाले असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला.

10:37 June 03

मविआ नेत्यांची भुजबळ यांच्या निवासस्थानी बैठक

मुंबई - मविआ नेत्यांची भुजबळ यांच्या निवासस्थानी बैठक झाली. यामध्ये जातिनिहाय जनगणना महाराष्ट्रात करण्याबाबत चर्चा झाली. जातीनिहाय जनगणनेला केंद्राचा विरोध आहे. तसेच राज्यसभा, विधान परिषद निवडणुका बिनविरोध करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन प्रयत्न करत आहोत, असेही भुजबळ यांनी सांगितले.

09:48 June 03

Breaking news live page 3 June 2022, मविआचे नेते आज घेणार फडणवीस यांची भेट

मुंबई - महविकास आघाडीचे नेते राज्यसभा व विधान परिषद निवडणुकीसंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांची आज भेट घेणार.

Last Updated : Jun 3, 2022, 7:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details