महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Breaking News Live Page 2 June 2022; काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण

Breaking News Live Page 2 June 2022
Breaking News Live Page 2 June 2022

By

Published : Jun 2, 2022, 8:02 AM IST

Updated : Jun 2, 2022, 1:33 PM IST

13:30 June 02

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण

उदयपूर - काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सौम्य ताप आणि काही लक्षणे दिसून आली आहेत. त्यांनी स्वतःला आयसोलेट केले आहे आणि आवश्यक ते वैद्यकीय उपचार देण्यात येत आहेत.

10:04 June 02

काश्मीर हत्यांवरुन संजय राऊत यांची भाजपवर सडकून टीका

मुंबई - कश्मीर पंडित रस्त्यावर उतरले. तर प्रधानमंत्री, गृहमंत्री फक्त निवडणुकांमध्ये व राजकारणामध्ये गुंतलेले आहेत. आमचे कश्मिरी पंडित मारले जात आहेत, अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली. त्यांच्याकडे दुर्बिणी लावल्या म्हणून शिवसेनेने बाबरी पाडली हे माहीत पडले. पळपुट्यानी आमच्यावर दुर्बिनी लावू नयेत, असाही टोली राऊत यांनी लगावला. हार्दिक पटेल विषयी बोलताना त्यांची देशद्रोही अशी व्याख्या भारतीय जनता पक्षाने केली होती, आता ते पवित्र झाले का असा सवालही राऊत यांनी केला.

09:21 June 02

हार्दिक पटेलचा आज भाजप प्रवेश

अहमदाबाद - "मी आजपासून एक नवीन अध्याय सुरू करणार आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशासाठी काम करेन," हार्दिक पटेलने ट्विट करुन दिली माहिती. त्यांनी नुकतीच काँग्रेस सोडली आणि आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

09:20 June 02

पालघरमध्ये 11 व 12 जून रोजी सहावे महिला मराठी साहित्य संमेलन

पालघर - 11 व 12 जून रोजी सहावे महिला मराठी साहित्य संमेलन शहरात आयोजित. साहित्य संमेलनास ज्येष्ठ कथालेखिका मोनिका गजेंद्रगडकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि अभिनेत्री मधुरा वेलणकर राहणार उपस्थित राहणार.

07:48 June 02

Breaking News Live Page 2 June 2022, केकेच्या पार्थिवावर आज दुपारी १२ वाजता अंत्यसंस्कार

मुंबई -दिवंगत गायक केके यांचे पार्थिव आज सकाळी 10.30 ते 12.30 या वेळेत त्यांच्या निवासस्थानी पार्क प्लाझा येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी 1 वाजता वर्सोवा येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Last Updated : Jun 2, 2022, 1:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details