नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील प्रगती मैदान एकात्मिक ट्रान्झिट कॉरिडॉर अंतर्गत बांधण्यात आलेल्या आयटीपीओ बोगद्याला भेट दिली. यावेळी त्यांनी जमिनीवर पडलेला कचरा स्वत: हाताने उचलला.
VIDEO : पंतप्रधान मोदींनी स्वत: हाताने उचलला कचरा - Maharashtra Breaking News
13:59 June 19
VIDEO : पंतप्रधान मोदींनी स्वत: हाताने उचलला कचरा
13:48 June 19
भाडोत्री सैनिक तसे भाडोत्री पंतप्रधान, मुख्यमंत्री आणा- उद्धव ठाकरेंची अग्नीपथ योजनेवर टीका
मुंबई- उद्धव ठाकरे यांनी अग्नीपथ योजनेवर टीका केली आहे. उगाच स्वप्ने दाखवून त्यांच्या भवितव्याशी खेळणे आहे. भाडोत्री सैनिक आणले जात आहेत, तसे भाडोत्री पंतप्रधान, मुख्यमंत्री आणा, असा टोला मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारला लगावला आहे.
13:41 June 19
शिवसेनेने हिंदुत्वाचा नारा बुलंद केला - उद्धव ठाकरे
मुंबई - धाडसाला मरण नसते. हा शिवसेनेचा स्थायीभाव आहे. आणीबाणीत शिवसेनेवर बंदीच आली असे वातावरण होते. त्यावेळी विरोधी पक्ष हतबल होता. आता शिवसेना मजबूत झाली आहे. ज्यावेळी हिंदुत्वाचा उच्चार करायाला कोणीच तयार नव्हते, तेव्हा शिवसेनेने हिंदुत्वाचा नारा बुलंद केला.
13:38 June 19
विधानपरिषद निवडणुकीची मला चिंता नाही. निवडणुकीत शिवसेना विजयी होणारच- उद्धव ठाकरे
मुंबई- शिवसेनेत गद्दार कोणीही राहिलेले नाही. फाटाफुटीचे राजकारण झाले तरी शिवसेना मजबूत झालेली आहे. हे इतिहासात आपण दाखवून दिले आहे.
13:22 June 19
मोदी सरकारच्या विरोधात असंतोष, उद्धव ठाकरे यांच्यामुळे महाराष्ट्र शांत
मुंबई- जोपर्यंत सूत्रे आमच्याकडे म्हणजे शिवसेनेकडे महाराष्ट्र शांत आहे. मोदी सरकारच्या विरोधात असंतोष असल्याचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले. ते शिवसेनेच्या ५६ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत आहेत.
13:08 June 19
पाटणा विमानतळावरून उड्डाण करणाऱ्या विमानाला आग, सुरक्षित लॅडिंग केल्याने १८५ प्रवासी सुरक्षित
पाटणा - पाटणा विमानतळावरून दिल्लीला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या विमान क्रमांक sg723 ला टेक ऑफ केल्यानंतर आग लागली. त्यानंतर पायलटने विमानाचे सुरक्षित लँडिंग केले. विमानात 185 प्रवासी होते. विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.
12:39 June 19
शिरवळजवळ महामार्गावर वारकऱ्यांच्या ट्रॉलीला अपघात; ३० जखमी, एका वारकऱ्याचा मृत्यू
सातारा- शिरवळ जवळ महामार्गावर पहाटेच 4 वाजता वारकऱ्यांच्या ट्रॉलीला अपघात झाला. या अपघातात ३० वारकरी जखमी झाले आहेत. तर एका वारकऱ्याचा मृत्यू झाला आहे. वारकरी कोल्हापूर जिल्ह्यातील भादोले आणि लाहोटे येथील आहेत. हे सर्व आळंदीला निघाले होते. जखमींवर शिरवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.
11:59 June 19
जालना पानशेद्रा सोसायटी निवडणुकीत तणाव- माजी-आजी आमदारांमध्ये राडा
जालना- जालन्यात शिवसेनेच्या अर्जुन खोतकर आणि काँग्रेस आमदार आमदार कैलास गोरंट्याल गटात राडा झाल्याची घटना आज सकाळी जालना तालुक्यातील पानशेंद्रा गावात घडली आहे.पानशेंद्रा गावात विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीच्या मतदाना दरम्यान हा झाल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेना नेते अर्जुन खोतकर आणि काँग्रेस आमदार एकाच वेळी मतदान केंद्रा समोर आल्याने कार्यकर्त्यानी गोधळ घातला. दरम्यान यात बाचाबाची दगडफेक झाल्याची माहिती समोर आली
10:40 June 19
शिवसेना हिंदूंच्या न्याय हक्कासाठी लढत आहे - संजय राऊत
मुंबई - शिवसेना ५६ वा वर्धापन दिन साजरा करत असताना खासदार संजय राऊत यांनी नाव न घेता भाजपचा समाचार घेतला आहे. विधान परिषद निवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडीमध्ये योग्य समन्वय आहे. भाजपने किती अफवा पसरवल्या तरी काही होणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अब तक छप्पन, आगे भी जायेंगे असे सांगत देशाचे राजकारण प्रादेशिक पक्षांच्या करंगळीवर उभे असल्याचे मत व्यक्त केले आहे.
10:20 June 19
शिवसेनेचा आज 56 वा वर्धापन दिन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज शिवसैनिकांशी ऑनलाईन साधणार संवाद
मुंबई- विधान परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना शिवसेनेचा 56 वा वर्धापन दिन पवईतील वेस्ट ईन हॉटेलमधून साजरा केला जाणार आहे. वर्धापन दिनाची जय्यत तयारी शिवसेनेकडून सुरु झाली आहे. दुपारी 12 वाजता ऑनलाईन पध्दतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
09:38 June 19
भारतीय हवाई दलाने अग्नीपथ मोहिमेबाबत जाहीर केली सविस्तर माहिती
नवी दिल्ली- केंद्र सरकारने सैन्यदलातील भरतीबाबत अग्नीपथ मोहिम जाहीर केली आहे. या योजनेवरून नाराज झालेल्या बिहार, तेलंगणा आदी राज्यांमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलने केली आहेत. हा तीव्र असंतोष पाहता योजनेबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी हवाई दलाने योजनेबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
09:22 June 19
सवेरा इमारतीच्या १४व्या मजल्यावर रात्री १२ वाजण्याच्या सुमारास आग, १४ जणांची सुखरूप सुटका
बोरिवली- मुंबईला लागून असलेल्या बोरिवली येथील धीरज सवेरा नावाच्या इमारतीच्या १४व्या मजल्यावर रात्री उशिरा १२ वाजण्याच्या सुमारास आग लागली, ही आग २फ्लॅटमध्ये होती. त्यात १५ व्या मजल्यावर सुमारे १४जण अडकले होते. अग्निशमन दलाने सर्वांना सुखरूप वाचविले आहे.अग्निशमन दलाच्या ६ गाड्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली. सध्या कुलिंगचे काम सुरू आहे.
08:37 June 19
पत्नीसोबत अनैतिक संबंधाच्या संशयावरून मित्रानेच काढला मित्राचा काटा
औरंगाबाद- पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून मित्राने मित्राचा रुमालाने गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. शिल्लेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या वरखेड शिवारात दिनांक १८ शनिवार रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास घटना उघडकीस आली आहे.
07:13 June 19
नाकाद्वारे देण्यात येणाऱ्या जगातील पहिल्या कोरोना लशीला मंजुरीची प्रतिक्षा
नवी दिल्ली-भारत बायोटेकचे अध्यक्ष आणि एमडी डॉ. कृष्णा एला म्हणाले, की आम्ही क्लिनिकल चाचणी पूर्ण केली आहे, डेटा विश्लेषण चालू आहे. आम्ही डेटा नियामक एजन्सीकडे अर्ज करू. सर्व काही ठीक असल्यास, आम्हाला लॉन्च करण्याची परवानगी मिळेल. ही जगातील पहिली वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध झालेली कोविड-19 लस असेल.
07:08 June 19
पोलीस आयुक्तांवर नामुष्की, पोक्सो आणि विनयभंगाबाबतचा काढावा लागला सुधारित आदेश
मुंबई-पोक्सो आणि विनयभंगाची तक्रारी डीसीपी परवानगीनंतरच दाखल करण्यात यावा तशी निर्देश मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी दिल्यानंतर वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या होते तिच्याविरोधात बाल कल्याण आयोगाने दिसते नाराजी व्यक्त केली होती तसेच आदेश बदल न करण्याचे निर्देश दिल्यानंतर आज पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी नवीन आदेश जारी करत विनयभंग अथवा पोक्सोच्या तक्रारीमध्ये दखलपात्र गुन्हा निष्पन्न होतोय किंवा तक्रारीत संशयास्पद काही नसेल तर तत्काळ गुन्हा दाखल करावा असे आयुक्तांनी त्यांच्या सुधारित आदेशात नमूद केले आहे .
06:42 June 19
आयडीबीआय बँकेची 31 कोटी रुपयांची फसवणूक, आर्थिक गुन्हे शाखेकडून एजीआयएल संचालकांवर गुन्हा दाखल
मुंबई-मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने ऑरो गोल्ड ज्वेलरी प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालकांवर आयडीबीआय बँकेचे 31 कोटी 29 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे यापूर्वी याप्रकरणी प्रथम कफ परेड ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्याने शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
06:26 June 19
VIDEO : पंतप्रधान मोदींनी स्वत: हाताने उचलला कचरा
मुंबई - विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत भाजपाच्या सर्व आमदारांची कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वाच्या सूचना आमदारांना देण्यात आल्या. या बैठकीला भाजपा आणि मित्रपक्षांचे आमदार देखील उपस्थित होते. आपले आमदार फुटू नयेत म्हणून सर्वच पक्षांनी आपापल्या आमदारांना विविध हॉटेलमध्ये ठेवला आहे.