महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

RajyaSabha Election Breaking news; कर्नाटकात राज्यसभा निवडणुकीत एचडी देवगौडा यांचे सर्व उमेदवार पराभूत, निर्मला सीतारामन यांचा विजय

Breaking news live page 10 June 2022
Breaking news live page 10 June 2022

By

Published : Jun 10, 2022, 8:08 AM IST

Updated : Jun 10, 2022, 9:53 PM IST

21:49 June 10

कर्नाटकात राज्यसभा निवडणुकीत एचडी देवगौडा यांचे सर्व उमेदवार पराभूत, निर्मला सीतारामन यांचा विजय

बंगळुरू-एचडी देवेगौडा यांचे जनता दल (धर्मनिरपेक्ष) यांना त्यांचे राज्य असलेल्या कर्नाटकात राज्यसभेच्या निवडणुकीत एकही जागा जिंकता आली नाही. भाजपच्या निर्मला सीतारामन, जगेश आणि लहरसिंग सिरोया यांनी चारपैकी तीन जागा जिंकल्या, तर काँग्रेसची जयराम रमेश यांनी फक्त उर्वरित जागा जिंकल्या. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सीटी रवी यांनी पक्षाने तीन जागा जिंकल्याची पुष्टी केली आहे.

21:36 June 10

राज्यसभा निवडणुकीत राजस्थानमध्ये काँग्रेसचे तीन आणि भाजपचा एक उमेदवार विजयी

जयपूर- राजस्थानच्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे तीन आणि भाजपचा एक उमेदवार विजयी झाला आहे. काँग्रेस नेते रणदीप सिंग सुरजेवाला, प्रमोद तिवारी आणि मुकुल वासनिक विजयी झाले आहेत. या निवडणुकीत भाजपचे घनश्याम तिवारी विजयी झाले. अपक्ष उमेदवार सुभाष चंद्रा यांचा निवडणुकीत पराभव झाला.

21:19 June 10

रवी राणा, सुधीर मुनगंटीवार यांची मते बाद करा, महाविकास आघाडीची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार

मुंबई - राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या ३ जणांनी मतदान प्रक्रियेच्या नियमांचे भंग केल्याचा आरोप करत भाजपाने थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. आता महाविकास आघाडी सरकारनेही रवी राणा विरोधात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. यासंदर्भात पत्र निवडणूक आयोगाला पाठवल्याने या निवडणुकीच्या मतमोजणीला विलंब होण्याची शक्यता आहे.

20:13 June 10

मुंबई पोलिसांनी केली हेल्मेट सक्ती, मुंबईतील हेल्मेट व्यावसायिकांचा व्यापार दुपटीने वाढला

मुंबई- मुंबईत गुरुवारपासून दुचाकीवर मागे बसणाऱ्या प्रवाशाने देखील हेल्मेट घालणे बंधनकारक करण्यात आले. नियमांचे पालन न केल्यास कडक कारवाईचा इशारा देखील मुंबई पोलिसांकडून देण्यात आला. त्यामुळे आता मुंबईत हेल्मेटची विक्री दुप्पटीने वाढली आहे. दंड भरण्यापेक्षा मुंबईकर हेल्मेट घेणे पसंत करत आहेत.

19:24 June 10

भारत निवडणूक आयोगाची परवानगी मिळाल्यानंतर राज्यसभेच्या निवडणुकीचे मतदान होणार सुरू

मुंबई- भारत निवडणूक आयोगाची परवानगी मिळाल्यानंतर राज्यसभेच्या निवडणुकीचे मतदान सुरू होणार आहे. ही माहिती शिवसेनेचे नेते व मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

19:10 June 10

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे शांतता राखण्याचे आवाहन

मुंबई-प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ मोठ्या प्रमाणावर मुस्लिम जनसमूदाय आज विविध ठिकाणी रस्त्यावर उतरला आहे. यासंदर्भात शातता राखण्याचे आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे.

18:54 June 10

आईने मोबाईल गेम खेळण्यापासून रोखल्याने मुंबईत किशोरवयीन मुलाची आत्महत्या

मुंबई-आईने मोबाईल गेम खेळू न दिल्याने मुंबईतील एका १६ वर्षीय मुलाने गुरुवारी आत्महत्या केली. आईसाठी सुसाईड नोट टाकल्यानंतर त्याने ट्रेनसमोर उडी मारल्याचे पोलिसांनी सांगितले. दिंडोशी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी 8 जूनच्या संध्याकाळी मुलाच्या आईने तो मोबाईलवर गेम खेळत असताना त्याचा फोन काढून घेतला. त्याला अभ्यास करण्यास सांगितले. त्यानंतर त्याने सुसाईड नोट लिहून घर सोडले.

18:38 June 10

अभिनेता शक्ती कपूर भाडेकरुबरोबरच्या वादात न्यायालयात धाव

मुंबई- मुंबई उच्च न्यायालयात आज अभिनेता शक्ती कपूर हे आले होते. जुहू येथील त्याचे घर एका दांपत्याला भाड्याने दिल्याचे प्रकरण आहे. संबंधित दांपत्यामध्ये आपसात भांडण झाल असून दोघही विभक्त झाले.

17:15 June 10

नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात महाराष्ट्रात सोलापूरसह औरंगाबादमध्ये निदर्शने

सोलापूर/औरंगाबाद- भाजपच्या प्रलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांना अटक करा या मागणीसाठी देशाच्या विविध भागात मुस्लिम सामाजाकडून निदर्शने करण्यात येत आहेत. नुपूर शर्मा यांनी प्रेषित मंहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले ( Nupur Sharma controversial remarks on Prophet Muhammad ) होते. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात महाराष्ट्रात ठिकठिकाणी महिलांनी निदर्शने केली आहेत. नवी मुंबईत महिलांनी निषेध मोर्चा दरम्यान सोलापूर येथेही महिलांनी मोर्चा काढला आहे.

16:40 June 10

महाराष्ट्रातील २८५ आमदारांचे राज्यसभेसाठी साडेतीन वाजेपर्यंत मतदान

महाराष्ट्रातील २८५ आमदारांनी राज्यसभेसाठी साडेतीन वाजेपर्यंत मतदान केले आहे.

16:03 June 10

महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडणून येतील - यशोमती ठाकूर

मुंबई - मंत्री यशोमती ठाकूर यांनी महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार राज्यसभा निवडणूक जिंकू शकतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यांच्या मतावर भाजपने आक्षेप घेतला होता.

15:40 June 10

एमआयएमकडे आम्ही मत मागितलेले नाही - नाना पटोले

मुंबई - काँग्रेस पक्षाने एमआयएमकडे कधीही मत मागितलेले नाही. मात्र त्यांना स्वतःहून काँग्रेसला मत द्यायचा असेल तर यावर काही हरकत नाही, असे एम आय आमच्या मतदानावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच काँग्रेसच्या एकूण 44 मतदान पैकी 42 मत काँग्रेसचे उमेदवार राजू प्रतापगडी यांना देण्यात आली असून उर्वरित दोन मतं महा विकास आघाडीचे चौथे आणि शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांना देण्यात आले असल्याचं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं.

15:31 June 10

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी पुण्यात तयार होत आहे स्पेशल तुकाराम पगडी

पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत १४ जून रोजी देहू येथील जगतगुरू संत तुकाराम महाराज मूर्ती, शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. या दौऱ्याची प्रशासनाच्यावतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मंदिर ट्रस्टतर्फे विशेष डिझाइनची पगडी घालण्यात येणार आहे. याकरिता पुण्यातील प्रसिद्ध मुरुडकर झेंडेवाले यांना देहू संस्थांन विश्वस्तांनी तुकाराम पगडी आणि उपरणे तयार करण्याची ऑर्डर दिली आहे. मुरुडकर यांच्याकडून विशेष अशी तुकाराम पगडी तयार करण्यात आली आहे.

13:57 June 10

दुपारी 1.24 वाजेपर्यंत 278 आमदारांनी मतदान केले

मुंबई - राज्यसभेसाठी विधानभवनात दुपारी 1.24 वाजेपर्यंत 278 आमदारांनी मतदान केले आहे.

13:45 June 10

मलिक यांना राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्याची परवानगी मिळण्याची शक्यता कमी

मुंबई - नवाब मलिक यांना राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्याची परवानगी मिळण्याची शक्यता फार कमी. दुसऱ्यांदा मुंबई उच्च न्यायालयात परवानगी साठी सुनावणीचा प्रयत्न केला गेला. मात्र न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी सुनावणीस नकार दिला.

13:34 June 10

काँग्रेसच्या 42 आमदारांनी आतापर्यंत केले मतदान

मुंबई - काँग्रेसच्या 42 आमदारांनी आतापर्यंत मतदान केले. पृथ्वीराज चव्हाण व बाळासाहेब थोरात यांचे मतदान अद्याप बाकी आहे. नितीन राऊत यांनी ही माहिती दिली. तर भाजपचा आक्षेप पीठासीन अधिकाऱ्यांनी फेटाळला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे चारही उमेदवार जिंकून येतील असेही ते म्हणाले.

13:06 June 10

उद्धव ठाकरे मतदानासाठी विधानभवन परिसरात

मुंबई - उद्धव ठाकरे यांनी विधानभवन परिसरात पाहणी केली. सर्वच पक्षांच्या आमदारांशी त्यांनी बातचित केली. मतदानाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

12:05 June 10

अफवा पसरवून परिवर्तन होईल असं भाजपला वाटतंय - जयंत पाटील

मुंबई - राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये मतभेद असल्याच्या बातम्या पेरल्या जात आहेत. अफवा पसरून परिवर्तन होईल असे भाजपला वाटत आहे. मात्र आमच्या चारही जागा निवडून येतील, असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला. विधिमंडळात हे प्रसार माध्यमांशी बोलत होते.

11:57 June 10

अबू आझमी यांचा महाविकास आघाडीला पाठिंबा

मुंबई - अबू आझमी यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. मत कोणाला द्यायचे हे आमदारानी ठरवावे. महाविकास आघाडीने आमच्यासोबत रहा असे सांगितले आहे.

11:29 June 10

महाविकास आघाडीचे सर्वच उमेदवार निवडून येतील - संजय राऊत

मुंबई - महाविकास आघाडीचे सर्वच उमेदवार निवडून येतील अशी ग्वाही संजय राऊत यांनी दिली आहे.

10:56 June 10

दीड तासात पन्नास टक्के मतदान पूर्ण

मुंबई - पहिल्या दीड तासात ५० टक्के मतदान पूर्ण झाले आहे. 143 आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला. राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या 60 हून अधिक आमदारांनी आणि काँग्रेसच्या 20 आमदारांनी मतदान केले आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे आमदार मतदानाला पोहोचले. त्यांनी मतदानाचा हक्क बजावला.

10:43 June 10

भाजपकडून सगळ्या खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत - उदय सामंत

मुंबई - सगळ्या खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. गैरसमज पसरवला जातोय असे महाविकास आघाडीचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे. आम्ही एकसंघ आहोत. संध्याकाळी संजय राऊत आणि संजय पवार निवडून येतील असेही ते म्हणाले. आपल्याकडे किती संख्याबळ आहे त्याच्या वरती उमेदवार निवडून येतो. भाजप कोणत्या आधारावर दावा करते ते संध्याकाळी स्पष्ट होईल. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे त्याला संध्याकाळी उत्तर मिळेल असेही आघाडीकडून सांगण्यात आले.

10:00 June 10

आगे आगे देखो होता है क्या, असे सांगून आमचे सगळे आमदार निवडून येणार - सचिन अहिर

मुंबई - आमचं काल रात्री आमदारांशी बोलणं झालं आहे. सगळे आमदार 10:30 वाजता येतील. आमचे सगळे आमदार यांची वेळ ठरलेली आहे, ते योग्य त्या वेळेत येतील. तान्हाजी सावंत देखील येतील अशी माहिती आमदार सचिन अहिर यांनी दिली. आगे आगे देखो होता है क्या, असे सांगून आमचे सगळे आमदार निवडून येणार असेही ते म्हणाले.

09:47 June 10

भाजपने त्यांचा तिसरा उमेदवार कुठल्या आधारावर दिला - अस्लम शेख

भाजपने त्यांचा तिसरा उमेदवार कुठल्या आधारावर दिला, अस्लम शेख यांचा सवाल

मुंबई - भाजपने त्यांचा तिसरा उमेदवार कुठल्या आधारावर दिला आहे, हे त्यांनी सांगावे. एमआयएम व समाजवादी हे पक्ष पूर्वीपासून महाविकास आघाडी सोबत होते व राहतील, अशी ग्वाही मंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे.

09:16 June 10

राज्यसभा निवडणूक मतदानाला सुरूवात

मुंबई - राज्यसभा निवडणूक मतदानाला सुरूवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सर्वात पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावला. सकाळच्या सत्रातील मतदानाला सुरुवात झाली, त्यानंतर त्यांनी पहिल्यांदा मतदान केले. मतदानासाठी आमदार विधानभवप परिसरात पोहोचत आहेत.

09:07 June 10

एमआयएमचा महाविकास आघाडीला राज्यसभा निवडणुकीत पाठिंबा

औरंगाबाद - एमआयएमचा महाविकास आघाडीला राज्यसभा निवडणुकीत पाठिंबा. खा. इम्तियाज जलील यांनी ट्विट करुन दिली माहिती. भाजपला दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला असल्याचे ट्विटमध्ये त्यांनी स्पष्ट केले आहे.

08:24 June 10

भाजप आमदारांची बस विधान भवनात दाखल, पियुष गोयलही पोहोचले

मुंबई - राज्यसभा निवडणूक मतदानासाठी भाजप आमदारांची बस विधान भवनात दाखल झाली आहे. तसेच शिवसेना व राष्ट्रवादीत काहीच नाराजी नाही असे मत सचिन अहिर यांनी व्यक्त केले आहे. यावेळी मंत्री आणि भाजपचे उमेदवार पियुष गोयलही विधानभवन परिसरात दाखल झाले आहेत.

08:09 June 10

पहिल्या फेरीमध्ये आमचे चारही उमेदवार जिंकतील - बाळासाहेब थोरात

मुंबई - राज्यसभेची निवडणूक रंगतदार आणि चुरशीची होईल असे सांगितले जात आहे मात्र, आम्हाला काही अडचण नाही आहे, पहिल्या फेरीमध्ये आमचे चारही उमेदवार जिंकतील असा विश्वास काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे. भाजप नेते प्रवीण दरेकर यांनीही आपलेच उमेदवार विजयी होतील असा दावा यावेळी केला.

08:02 June 10

RajyaSabha Election Breaking news, कर्नाटकात राज्यसभा निवडणुकीत एचडी देवगौडा यांचे सर्व उमेदवार पराभूत, निर्मला सीतारामन यांचा विजय

मुंबई - राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या ३ जणांनी मतदान प्रक्रियेच्या नियमांचे भंग केल्याचा आरोप करत भाजपाने थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. आता महाविकास आघाडी सरकारनेही रवी राणा विरोधात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. यासंदर्भात पत्र निवडणूक आयोगाला पाठवल्याने या निवडणुकीच्या मतमोजणीला विलंब होण्याची शक्यता आहे.

विधानसभेतून राज्यसभेवर ( Rajyasabha Election 2022 ) जाणाऱ्या सहा जागांसाठी आज ( 10 जून ) मतदान झाले आहे. मात्र, राज्यसभा निवडणुकीच्या मतदानानंतर पाच वाजता मतदान मोजणीला सुरुवात होणे आवश्यक होते. मात्र भारतीय जनता पक्षाकडून आक्षेप केंद्रीय निवडणूक आयोगाकडे नोंदविण्यात आला. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे नोंदवण्यात आलेल्या आक्षेपानंतर मतमोजणीची प्रक्रिया केंद्रीय निवडणूक आयोगाने थांबवली आहे.

एकूण सात उमेदवार या निवडणुकीत आपले नशीब आजमावत असून, त्यापैकी सहाव्या जागेची निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. ही जागा आपल्याकडे खेचण्यासाठी महाविकास आघाडी विरोधात भाजपाने जोर लावला आहे. मात्र, अपक्ष, इतर छोटे पक्षांच्या आमदारांची मते निर्णायक ठरणार असल्याने ते कोणाला मतदान करणार हे या निवडणूक प्रक्रियेनंतर समोर येणार आहे.

Last Updated : Jun 10, 2022, 9:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details