जळगाव - राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार ईश्वरलाल जैन यांची २४ कोटी ६३ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. नाशिक येथील अशोक बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स कंपनीचे मालक अशोक मोतीलाल कटारिया यांच्यासह पाच जणांनी फसवणूक केल्याची तक्रार ईश्वरलाल जैन यांनी केली आहे. त्यावरून जळगावातील शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
Big Breaking News : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार ईश्वरलाल जैन यांची २४ कोटी ६३ लाखांची फसवणूक - राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार ईश्वरलाल जैन यांची फसवणूक
21:30 October 28
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार ईश्वरलाल जैन यांची २४ कोटी ६३ लाखांची फसवणूक
21:10 October 28
कोल्हापूर, सांगलीत एसटी कर्मचारी आक्रमक; बसस्थानक परिसरात घोषणाबाजी
कोल्हापूर - एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहे. त्यांनी संयुक्त कृती समितीच्या भूमिकेला विरोध केला आहे. अनेक कामगारांनी सरकारच्या भूमिकेचा निषेध करत घोषणाबाजी करत आहेत. कृती समितीने विश्वासघात केला असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. तर एसटीचे विलागीकरण करण्याची मागणी आमच्या आंदोलनात नसल्याचे जबाबदार पदाधिकाऱ्याची माहिती दिली आहे. मध्यवर्ती बसस्थानक परिसरात प्रचंड घोषणाबाजी सुरू आहे.
21:09 October 28
भाजपा आमदार गोपीचंद पडळकरची भूमिका -
सांगली - राज्य सरकारमध्ये एसटीचा विलिनीकरण होत नाही, तोपर्यंत एसटीचा संप चालूच राहील आणि मध्यरात्रीनंतर हा संप सुरू होणार असल्याचे भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी स्पष्ट केले आहे. काही कामगार संघटनांना हाताशी धरून परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या मध्ये फूट पाडण्यासाठी काही घोषणा केल्या आहेत, पण एसटी कर्मचाऱ्यांची मूळ मागणी एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे अशी आहे, त्यामुळे संप अटळ अशी भूमिका जाहीर केली आहे.
19:17 October 28
बविआला धक्का; सुदेश चौधरीसह किशोर पाटील शिवसेनेत
आमदार हितेंद्र ठाकूर यांचे निकटवर्ती सुदेश चौधरी यांच्यासह नगरसेवक किशोर पाटील यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे.
19:17 October 28
हॅकर मनीष भंगाळे यांचा एनसीबीच्या कारवाई संशय
जळगाव - 'मला भेटायला आलेले दोन्ही व्यक्ती या सॅम डिसुजाच्या बाजूच्या असू शकतात' असा दावा हॅकर मनीष भंगाळे यांनी केला आहे. ड्रग्ज प्रकरणातील चॅटसंदर्भात निश्चित फॅब्रिकेटेड विषय असू शकतो, असाही दावा मनीष भंगाळे याने केलाय. एनसीबीच्या कारवाईवरही त्याने संशय व्यक्त केला आहे.
19:09 October 28
एसटी कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपाेषण मागे, महागाई भत्ता व वाढीव घरभाडे भत्ता मान्य
मुंबई -एसटी कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपाेषण मागे घेण्यात आले आहे. महागाई भत्ता व वाढीव घरभाडे भत्ता देण्याची मागणी मान्य करण्यात आली आहे.
1. महागाई जो 12 टक्के होता तो आता शशनाप्रमाणे 28 टक्के करण्यात आला.
2. घरभाडे भत्ता 7, 14, 21 वरून आता शाशनाप्रमाणे 8, 16, 24 टक्के देण्यात येणार आहे.
वार्षिक वेतनवाढीचा दर 2 टक्यावरून 3 टक्के करण्याबाबत दिवाळी नंतर बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल.
19:09 October 28
ठाण्याच्या कोर्टानं लोकल पोलिसांकरवी परमबीर सिंहांविरोधात अटक वॉरंट जारी केलंय
ठाणे न्यायालयाने परमबीर सिंग यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. ठाणे न्यायालयाने ठाणे पोलिसांना परमबीर सिंग यांना अटक करुन न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले आहेत. ठाणे नगर पोलीस ठाण्यात परमबीर सिंग यांच्या विरोधात दाखल असलेल्या खंडणी आणि खोट्या गुन्ह्यात अडकण्याच्या गुन्ह्यात ठाणे न्यायालयाची सुनावणी, केतन तन्ना आणि सोनू जलान यांनी दाखल केला आहे. परमबीर सिंग यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे, परमबीर सिंग अद्यापही फरार आहेत.
18:54 October 28
अशोक चव्हाण यांच्या अधिपत्याखालील साखर कारखान्याची झाडाझडती
नांदेड - गत दोन दिवसांपासून बुलढाणा अर्बन बॅंकेवर छापे टाकून चौकशी सुरू आहे. या चौकशीत बॅंकेने सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या अधिपत्याखालील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याला दिलेल्या कर्जाची ही चौकशी होत आहे. दरम्यान देगलूर विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हेतूने ही कार्यवाही असल्याची प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली आहे.
16:43 October 28
आर्यन खानला जामीन मंजूर
आर्यन खानला जामीन मंजूर
16:33 October 28
पुणे पोलिसांनी किरण गोसावींना 10 दिवसांच्या पोलीस कोठडी केली मागणी
पुणे - किरण गोसावीला कोर्टात हजर करण्यात आले आहे. यावेळी गोसावींना पोलीस कोठडी देण्यास एकही सबळ कारण नाही असा दावा गोसावीच्या वकीलांना केला आहे. तर पुणे पोलिसांनी केलेल्या दाव्यात असे म्हटले आहे की, गोसावी यांनी बनावट सिम कार्ड, कागदपत्राचा वापर करून किती जणांना फसवले आहे. याची काही माहिती नाही आहे. ही माहिती घेण्यासाठी गोसावींना 10 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात यावी. पोलिसांनी किरण गोसावी प्रकरणात 2 कलम वाढवले आहे. तर त्याच्याकडून 3 लाख रिकव्हर करायचे आहेत असेही पोलिसांनी म्हटले आहे.
15:40 October 28
मुंबई पोलिसांचे भाजपाचे मनीष भानुशाली यांना समन्स
मुंबई पोलिसांनी क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदार भाजपाचे मनीष भानुशाली यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे.
11:26 October 28
अभिनेत्री क्रांती रेडकरचे मुख्यमंत्र्यांना पत्र
अभिनेत्री क्रांती रेडकरचे मुख्यमंत्र्यांना पत्र
खासगी आयुष्य सार्वजनिक होत असल्याबद्दल व्यक्त केली चिंता
बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेऊन मुख्यमंत्र्यांकडे न्याय देण्याचे क्रांती यांचे भावनिक आवाहान
10:06 October 28
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. ते दोन दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर होते. त्यांची प्रकृती स्थिर असून संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करण्याचे आवाहन केले आहे.
08:59 October 28
कोल्हापूर विभागातील एसटी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन
एसटी कर्मचारी विविध मागण्यांसाठी आक्रमक झाले असून कोल्हापूर विभागातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात येणारी-जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. १०० टक्के वाहतूक बंद झाल्याने एसटीच्या अनेक फेऱ्या रद्द झाल्याने ऐन सणासुदीला प्रवाशांचे हाल होत आहे.
07:30 October 28
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील पंच किरण गोसावी पुणे पोलिसांच्या ताब्यात
- आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील पंच किरण गोसावी पुणे पोलिसांच्या ताब्यात
06:30 October 28
धुळे : वाहन एकमेकांवर आदळली; तिघांचा मृत्यू तर अनेकजण जखमी
धुळे जिल्ह्यात सात ते आठ वाहनं एकमेकांवर धडकून झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.