महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Driving Licence Canceled : राज्यातील २८ हजार वाहन चालकांचे लायसन्स रद्द; मोबाईल वापरल्याप्रकरणी सर्वाधिक निलंबित! - 28 हजार वाहनचालक लायसन्स रद्द

२०२१ मध्ये वाहतूक नियम मोडणाऱ्या राज्यातील तब्बल २८ हजारपेक्षा जास्त वाहन चालकांचे परवाने(लायसन्स) परिवहन विभागाकडून रद्द (Driving Licence Cancelled) करण्यात आले आहेत. यामध्ये सर्वाधिक लायसन्स हे वाहन चालवताना मोबाईल वापरल्याप्रकरणी निलंबित केल्याची माहिती परिवहन विभागाने दिली आहे.

rto
लायसन्स फाईल फोटो

By

Published : Mar 11, 2022, 3:34 PM IST

मुंबई -वाहनांची संख्या ज्या झपाट्याने वाढते, त्याचपटीने अपघात तर वाढतच आहेत. पण वाहतूक नियमांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन (Break RTO Rules) होताना दिसून येत आहे. २०२१ मध्ये वाहतूक नियम मोडणाऱ्या राज्यातील तब्बल २८ हजारपेक्षा जास्त वाहन चालकांचे परवाने(लायसन्स) परिवहन विभागाकडून रद्द (Driving Licence Cancelled) करण्यात आले आहेत. यामध्ये सर्वाधिक लायसन्स हे वाहन चालवताना मोबाईल वापरल्याप्रकरणी निलंबित केल्याची माहिती परिवहन विभागाने 'ईटीव्ही भारत'ला दिली आहे.

१ हजार २३७ लायसन्स हे अद्याप प्रलंबित -

वाहतुकीचे नियम वारंवार मोडणार्‍या वाहनचालकांना लगाम लावण्यासाठी वाहतूक विभागाने चांगली कंबर कसली आहे. राज्यात अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यासाठी वाहतूक नियम मोडणाऱ्या चालकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. मात्र दंडात्मक कारवाईनंतरही चालकांना जरब बसत नसल्याने शासनाने थेट लायसन्स निलंबनाची कारवाई सुरु केली आहे. त्याप्रमाणे वाहतूक प्रशासनाने परिवहन विभागाकडे २८ हजार ०७१ लायसन्स निलंबित करण्याचा प्रस्ताव पाठवला होता. त्यावर परिवहन विभागाने ही कार्यवाही केली आहे अशी माहिती परिवहन विभागाकडून देण्यात आली आहे. परिवहन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाहतूक विभागाने पाठवलेल्या प्रस्तावांपैकी १ हजार २३७ लायसन्स हे अद्याप प्रलंबित आहेत. याशिवाय २८ हजार ०७१ चालकांचे लायसन्स निलंबित झालेले आहेत.

१३ नागरिकांचा अपघाती मृत्यू -

वाहतूक नियमांचे उल्लंघन, चालकाचा निष्काळजीपणा यामुळे रस्ते अपघाताचे प्रमाण वाढले आहे. प्रतिवर्षी देशात साधारण १.५०लाख वाहनचालकांचा मृत्यू रस्ते अपघातात होतो. राज्यात २०२१ साली २९ हजार ४९३ अपघात झाल्याची नोंद आहे. त्यामध्ये १३ हजार ५२८ नागरिकांचा जीव गेला, तर २३ हजार ७७ जखमी झाले. 2020 साली कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लॉकडाऊन असताना सुद्धा राज्यात २४ हजार ९७१ अपघात झाले. या अपघातांमध्ये ११ हजार ५६९ नागरिकांना प्राणांना मुकावे लागले, तर १९ हजार ९१४ लोक गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे राज्यात अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न सुरु आहे.

मोबाईलचा वापर करणे पडले महागातप-

वाहने चालवताना मोबाइल वापरण्यावर बंदी असली तरीही हजारो वाहनचालकांकडून त्याकडे सर्रासपणे कानाडोळा केला जात आहे. त्यामुळे रस्ते अपघात प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. वाहन चालवता मोबाईलवर बोलणाऱ्या वाहन चालकांनावर २०२१ मध्ये मोठी कारवाई केली आहे. राज्यभरतील १० हजार ५२७ नागरिकांचा वाहन चालविताना मोबाईलचा वापर केल्यामुळे थेट परवाना निलंबित करण्यात आलेला आहेत

या कारणामुळे लायसन्स निलंबित?

नियमांचे उल्लंघन - निलंबित लायसन्सची संख्या
वाहन चालवताना मोबाईलचा वापर- १०,५२७
सिग्नल जंपिंग- ७ हजार २८६
माल वाहतूक वाहनांत ओव्हलोडींग- ३ हजार ४४
विनाहेल्मेट दुचाकी चालवणे- २ हजार ५५२
ओव्हर स्पीडिंग- १ हजार ६९०
माल वाहतूक वाहनांत प्रवासी वाहतूक- १ हजार ३३९
मद्य किंवा नशा करून वाहन चालवणे - ८३५
वाहन चालवताना सिटबेल्ट न वापरणे - ७९८

ABOUT THE AUTHOR

...view details