मुंबई : दिंडोशी शिवशाही प्रकल्प येथून कुर्लाकडे जाणाऱ्या बसचा ब्रेक फेल झाल्याने ( brake failure of best bus in dindoshi ) अपघात झाला आहे. या अपघातात बस चालक वाहक प्रवासी असे एकूण ४ जण जखमी झाले ( four injured in bus accident in mumbai ) आहेत. जखमींना जोगेश्वरी येथील ट्राॅमा व कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेची चौकशी केली जात असल्याची माहिती बेस्ट प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
बसचा अपघात -मिळालेल्या माहितीनुसार, दिंडोशी शिवशाही प्रकल्प ते कुर्ला पश्चिम स्थानकादरम्यान धावणाऱ्या बेस्ट बस रुट नंबर ३२६ बस क्रमांक एमएच ०- एपी ०४७६ या बसचा संतोष नगर दिंडोशी ( best bus accident at santosh nagar dindoshi ) येथे दुपारी ३.३० वाजता ब्रेक फेल झाला. कुर्ला डेपोची ( Kurla depos bus accident ) ही बस होती. या बसमध्ये प्रवासी होते; मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवासी सुखरूप असले तरी चालक पुंडलिक धोंगडे व कंटक्टर आबासाहेब कोरे या दोघांसह एक प्रवासी व रिक्षा चालक भुवाळ पांडे जखमी झाले. त्यांना तातडीने ट्राॅमा केअर व शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या जखमींची प्रकृती स्थिर आहे.