महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कुर्ला-सायनदरम्यानच्या एलबीएस महामार्गावर बच्चेकंपनीने लुटला पावसाचा आनंद - mumbai

लाल बहादूर शास्त्री महामार्गवर आज जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत पाणीच पाणी दिसत होते. या पाण्यातून जाणारी वाहने आणि रस्ता काढत असलेले नागरिक पाहून बच्चेकंपनीने या पाण्यात मस्ती केली. एकमेकांना रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्यात पाडण्यापासून ते एकमेकांवर पाणी फेकेपर्यंत बच्चे कंपनीने या पाण्याचा आनंद लुटला.

कुर्ला-सायनदरम्यानच्या एलबीएस महामार्गावर बच्चेकंपनीने लुटला पावसाचा आनंद

By

Published : Aug 4, 2019, 9:58 PM IST

मुंबई -कुर्ला-सायनदरम्यानचा लाल बहादूर शास्त्री महामार्ग मुसळधार पावसामुळे जलमय झाला होता. या पाण्यात रविवारची सुट्टी असल्याने बच्चे कंपनीनेही मनसोक्त आनंद लुटला.

कुर्ला-सायनदरम्यानच्या एलबीएस महामार्गावर बच्चेकंपनीने लुटला पावसाचा आनंद

एलबीएस मार्गावर आज जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत पाणीच पाणी दिसत होते. या पाण्यातून जाणारी वाहने आणि रस्ता काढत असलेले नागरिक पाहून बच्चेकंपनीने या पाण्यात मस्ती केली. एकमेकाना रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्यात पाडण्यापासून ते एकमेकांवर पाणी फेकेपर्यंत बच्चे कंपनीने या पाण्याचा आनंद लुटला.

मुंबई आणि परिसरात काल मध्यरात्रीपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे कुर्ला ते सायनदरम्यान असलेल्या एलबीएस महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे या पाण्यामध्ये येणाऱ्या वाहनांपासून ते जात असलेल्या नागरिकांपर्यंत अनेकांनी या बच्चे कंपनीने हा आनंद घेतला. रविवारची सुट्टी असल्याने शाळाही बंद होत्या. यामुळे अगदी आपल्या घराशेजारी असलेल्या रस्त्यांवर साचलेल्या पाण्यातही या मुलांनी मस्ती केली.

ABOUT THE AUTHOR

...view details