मुंबई - मुंबईत बोरिवली परिसरात राहणाऱ्या एका मुलाने त्यांच्या वडीलांची बोगस सही करुन वडीलांची अडीच कोटींची फसवणूक केली ( Boy Mortgaged His Father Shop Borivali ) आहे. याप्रकरणी बोरिवली पोलिसांनी मुलाला अटक केली ( Borivali Police Arrested ) आहे. न्यायालयाने आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, 77 वर्षीय हस्तीमल जैन यांचे बोरिवली मध्ये मोक्ष प्लाजा या इमारतीत तीन दुकाने आहेत. त्यांचा मुलगा प्रमोद जैन याने वडीलांची परवानगी न घेता बोगस सही करुन दुकान बँकेत गहाण ठेवले. त्यातून त्याला अडीच कोटींची रक्कम मिळाली. ही बाब कळताच हस्तीमल जैन यांनी बोरिवली पोलीस स्थानकात तक्रार केली होती.