महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दोन्ही धावपट्ट्या आज राहणार बंद! - दोन्ही धावपट्ट्या आज राहणार बंद

अनेक वेळा पावसाळ्यात धावपट्ट्या खराब होतात. त्यामुळे ऐन वेळी हवाई वाहतुकीवर त्याचा मोठा परिणाम होतो. विमान कंपन्यांनाही मोठा तोटा सहन करावा लागतो. तोटा होऊ नये यामुळे धावपट्टी बंद ठेवून त्याच्या डागडुजीचे काम केले जाणार आहे. या कामामुळे 110 देशांतर्गत उड्डानांवर तर 12 आंतराष्ट्रीय उड्डानांवर परिणाम होणार असून यातील काही उड्डाणे रद्द केली जातील आणि काही उड्डाणाच्या वेला बदलल्या जाणार आहेत.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ

By

Published : May 10, 2022, 7:54 AM IST

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील दोन्ही धावपट्ट्या आज सहा तास बंद राहणार आहेत. दोन्ही धावपटूंची डागदुजी करावयाची असल्याने सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत दोन्ही धावपट्ट्या बंद असणार आहेत. यामुळे जवळपास 122 उड्डानांवर परिणाम होईल. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आता पूर्ण क्षमतेने सुरू आहे. येणाऱ्या काळात पर्यटनाचा ओघ वाढल्याने प्रवाशांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढेल. तसेच पावसाळा हे सुरू होणार आहे. त्यामुळे पावसाळ्याआधी दोन्ही धावपटू त्याची डागडुजी व्हावी यासाठी आज दोन्ही धावपट्ट्या बंद ठेवून त्याचे काम केले जाईल.

हेही वाचा -Explosive Found In Nagpur : नागपुरात खळबळ.. रेल्वे स्थानकावर स्फोटकांनी भरलेली बॅग सापडली..

अनेक वेळा पावसाळ्यात धावपट्ट्या खराब होतात. त्यामुळे ऐन वेळी हवाई वाहतुकीवर त्याचा मोठा परिणाम होतो. विमान कंपन्यांनाही मोठा तोटा सहन करावा लागतो. तोटा होऊ नये यामुळे धावपट्टी बंद ठेवून त्याच्या डागडुजीचे काम केले जाणार आहे. या कामामुळे 110 देशांतर्गत उड्डानांवर तर 12 आंतराष्ट्रीय उड्डानांवर परिणाम होणार असून यातील काही उड्डाणे रद्द केली जातील आणि काही उड्डाणाच्या वेला बदलल्या जाणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details