मुंबई - आदिवासी समाज हा वनक्षेत्रात राहणारा पर्यावरण प्रेमी समाज आहे. या समाजाला पर्यावरणाच्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींची माहिती आहे. त्यामुळे 'इको पर्यटन' या संकल्पनेला चालना देऊन आदिवासी समाजातील युवकांना रोजगार देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी सांगितले.
डॉ. फुके यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी मंत्रालयात बैठक पार पडली. आदिवासी विकास विभागाला मागील पाच वर्षात केंद्रीय योजनांमधून प्राप्त निधी व खर्चाचा तपशील, प्राप्त निधीमधून सद्यस्थितीत राबविण्यात येत असलेले विविध उपक्रम तसेच उपक्रमांतर्गत करण्यात आलेले सामंजस्य करार व अंमलबजावणी विषयक मध्यस्थी जाणून घेण्यासाठी ही बैठक झाली.