मुंबई -महाशिवरात्री साजरी करण्यासाठी सोयाबीन पिकाची नासधूस केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने आज कोल्हापूर अधिकाऱ्यांना फटकारले आहे. महाशिवरात्री यात्रेसाठी जेसीबीच्या सहाय्याने शेतातील सोयाबीनचे पीक नष्ट केल्याप्रकरणी कोल्हापूर जिल्हा अधिकारी आणि कुरुंदवाड नगरपरिषद केएमसी यांच्या विरोधात शशिकला आंबडे यांनी याचिका दाखल केलेली आहे.
यात्रेसाठी पीक उद्ध्वस्त केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने कोल्हापूर प्रशासनाला फटकारले - पीक उद्ध्वस्त मुंबई उच्च न्यायालय प्रतिक्रिया
महाशिवरात्री साजरी करण्यासाठी सोयाबीन पिकाची नासधूस केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने आज कोल्हापूर अधिकाऱ्यांना फटकारले आहे.
यावर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने 1 मार्च रोजी संबंधित जमिनीचा कोणताही भाग उत्सवासाठी वापरण्यास अधिकाऱ्यांना मनाई आदेश दिला. दरम्यान महाशिवरात्री उत्सवासाठी केवळ सार्वजनिक रस्त्यांचाच वापर केला जाईल, असे हमीपत्र कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी न्यायालयात सादर केले आहे. आता याप्रकरणी पुढील सुनावणी 10 मार्चला होणार आहे. न्यायमूर्ती शाहरुख जे काथावाला आणि न्यायमूर्ती मिलिंद एन जाधव यांच्या खंडपीठाने 26 फेब्रुवारी रोजी शशिकला सुरेंद्र अंबाडे आणि इतरांनी अधिवक्ता धैर्यशील सुतार आणि निर्मल पगारिया यांच्यामार्फत केलेल्या याचिकेवर हा आदेश दिला. यामुळे यंदा कृष्णावेली यात्रेच्या आयोजनावर मर्यादा येणार आहेत.