मुंबई -मोबाईल चोरीप्रकरणी आरोपी असलेल्या व्यक्तीच्या मृत्यू नंतर मुंबई उच्च न्यायालयाने मृतदेहाचे दुसऱ्यादा शवविच्छेदन करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर सचिन जयस्वार यांच्यावर अंत्यसंस्कार त्याच्या कुटुंबीयांकडून करण्यात येतील.
जुलै 2018 पासून 17 वर्षीय मुलाचा मृतदेह जेजे हॉस्पिटलच्या शवागारात पडून आहे. दुसरे पोस्टमार्टम होईपर्यंत कुटुंबाने तो स्वीकारण्यास नकार दिला. न्यायमूर्ती एस एस शिंदे आणि न्यायमूर्ती मनीष पिटाळे यांच्या खंडपीठाने रुग्णालयात 6 एप्रिलपर्यंत शवविच्छेदन करण्याचे निर्देश दिले आणि त्यानंतर कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेण्यास सहमती दर्शविली आहे.
काय आहे प्रकरण -
मुलाच्या कुटूंबाच्या म्हणण्यानुसार मोबाइल चोरीच्या प्रकरणात सचिन जैसवर नावाच्या आरोपीला प्रकरणात धारावी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणात पहिला माहिती अहवाल (एफआयआर) न घेताच त्याला जबरदस्तीने पोलिस ठाण्यात नेले आणि ताब्यात घेण्यात आले, असा आरोप परिवाराने केला आहे.
कोठडीत असताना आरोपीला मारहाण केली गेली आणि अत्याचार केले गेले. मुलाच्या घरच्यांनी हस्तक्षेप केला आणि त्याला घरी घेऊन जाण्याची परवानगी पोलिसांनी दिली. या नंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेले जेथे काही दिवसांनी त्याचा मृत्यू झाला,असे ही त्याच्या परिवाराचे म्हणने आहे.
रोजगारासाठी भाजीपाला विक्री करणारे सचिनचे वडील पोलिसांविरोधात एफआयआर दाखल करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, पोस्टमॉर्टम अहवालात असे म्हटले आहे की, या आरोपींचा निमोनियामुळे मृत्यू झाला होता. याबद्दल असमाधानी कुटुंब तेव्हापासून दुसरे शवविच्छेदन करण्याची मागणी करत आहे.
पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज पाहून आणि दोन्ही बाजूंनी युक्तिवाद ऐकल्यानंतर खंडपीठाने, जे जे हॉस्पिटलच्या डीनला मृताच्या मृतदेहाचे दुसरे पोस्टमॉर्टम करण्यासाठी एक टीम गठीत करण्याचे निर्देश दिले आहेत. जेजे रुग्णालयाच्या डीनने हे सुनिश्चित केले पाहिजे की डॉक्टरांचे पथक दुसरे पोस्टमॉर्टम करवून घेईल, त्यात कोणीही प्रथम शवविच्छेदन करणाऱ्या पथकाचे सदस्य नसतील.