मुंबई -राज्यातील म्यूकरमायोसिसच्या परिस्थितीसह कोरोनासंबंधित याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयात प्रदीर्घ चर्चा सुरू आहे. न्यायमूर्ती अमजद सय्यद आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर याचिकांवर सुनावणी झाली. लहान मुलांमध्ये कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या? म्यूकरमायकोसिससाठी कोणतं औषधं उपयोगी आहे? राज्यातील रेमडेसिवीर इंजेक्शनची परिस्थिती काय आहे? असे सवाल हायकोर्टाने विचारले. त्यावर म्यूकरमायकोसिसवरील औषधाच्या निर्मितीसाठी आणखी पाच कंपन्यांना परवानगी दिली असून उत्पादकांची संख्या आता 7वरून 12 झाली आहे, असं केंद्र सरकारने सांगितलं. राज्य सरकारसह केंद्र सरकार आपली बाजू मांडली. यासंदर्भात काय काय उपाययोजना केल्या याची यादी राज्य सरकारने वाचून दाखवली.
औषधांचा तुटवडा
"म्यूकरमायकोसिसचा रूग्ण आढळल्यास त्यावर तत्काळ उपचार सुरू करण्याचे निर्देश दिलेले आहेत. 'अँपोथेरीसिल-बी' हे औषध सर्वात आधी म्यूकरमायकोसिसच्या रूग्णांना दिलं जातंय. या औषधाचे देशात केवळ 7 उत्पादक आहेत, त्यामुळे सध्या तुटवडा जाणवतोय "अशी माहिती राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी ह्यांनी न्यायालयाला दिली.