महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Bombay High Court लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपीचा मुंबई उच्च न्यायालयातर्फे जामीन मंजूर - Bombay High Court grants bail

दिल्लीतील सीआरपीएफ मध्ये नोकरीवर असलेल्या 26 वर्षीय तरुणीला लग्नाचे आमीष दाखवून; लैंगिक शोषण केल्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीला (accused in sexual abuse case) मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर (Bombay High Court grants bail) केला आहे.

Bombay High Court
मुंबई उच्च न्यायालयातर्फे जामीन मंजूर

By

Published : Sep 18, 2022, 4:42 PM IST

मुंबई : दिल्लीतील सीआरपीएफ मध्ये नोकरीवर असलेल्या 26 वर्षीय तरुणीला लग्नाचे आमीष दाखवून; लैंगिक शोषण केल्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीला (accused in sexual abuse case) मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर (Bombay High Court grants bail) केला आहे. आरोपी युवक मुंबई येथे टिव्ही मालिकांमध्ये काम करतो.

राजेश कुमार सिंग हा आरोपी मुंबईतील टीव्ही मालिकांमध्ये काम करतो. पीडित तरुणीने त्याच्यावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप करत; अंधेरीतील पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता. या आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. आरोपीचा 25 हजाराच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण :दिल्लीतील सीआरपीएफ मध्ये काम करत असलेल्या 26 वर्षीय तरुणी सोबत, मुंबईतील कलाकार असलेल्या युवकाची फेसबुक वर ओळख झाली होती. यानंतर या दोघांमध्ये फेसबुक वर अनेक तास चॅटिंग होत होती. त्यानंतर या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर या दोघांनीही व्हाट्सअप नंबर एकमेकांना शेअर केले. व्हाट्सअप वर देखील अनेक तास तरुण आणि तरुणी एकमेकांसोबत बोलत होते. त्यानंतर तरुणी आणि तरुण मुंबईत एका हॉटेलमध्ये भेटले. दरम्यान एकमेकांसोबत जवळ आल्यानंतर त्यांच्यात संबंध देखील झाल्याचे तक्रारीत लिहील्या गेले होते. पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीमध्ये असे सांगण्यात आले होते की, तरुणाने लग्न करण्याचे सांगितले होते. त्यानुसार त्याने त्याच्या आईसोबत देखील व्हिडिओ कॉल द्वारे ओळख करून दिली होती. मात्र, त्यानंतर लग्न करण्याच्या दिलेल्या आश्वासनावरुन तो तरुण मुखरल्याने; मुलीने पोलीसांमध्ये तक्रार दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details