मुंबई - तत्कालीन ठाकरे सरकार आणि विद्यमान शिंदे सरकारने औरंगाबाद शहराचे नामांतरण करून संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. याविरोधात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने याचिकाकर्त्याला संबंधित औरंगाबाद खंडपीठाकडे दाद मागण्याचे निर्देश दिले. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती.
नामांतराला विरोध करणारी जनहित याचिका -आगामी महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राज्यातील राज्यकर्त्यांनी औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराचे नामांतरणाचे ठराव केले. त्यानंतर या नामांतराला विरोध करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. शहरांचे नामांतरण करण्याचा वाद उच्च न्यायालयात पोहोचला होता. राज्यातील सत्तांतरानंतर होण्यापूर्वी महाविकास आघाडीने औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराचे नामांतर ठराव करुन केले होते. त्यानंतर शिंदे सरकारने महाविकास आघाडीचा निर्णय रद्द केला व पुन्हा या शहरांचे नाव बदलण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला. औरंगाबादचे संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशीव नामांतरणाचा पुन्हा ठराव मंजूर केला. याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती.