मुंबई - फिल्म निर्मात्या आणि डॉक्टर असलेल्या एका महिलेने शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर विविध आरोप करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर मंगळवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयात याचिका दाखल करताच, बोगस डिग्रीच्या खोट्या प्रकरणात याचिका कर्त्या महिला डॉक्टरला अटक केल्याचा दावा विरोधी पक्षकारांकडून करण्यात आला.
मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पोलीस आयुक्त यांना याप्रकरणी तातडीने लक्ष घालत आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील गुरुवार(24 जून) पर्यंत तहकूब करण्यात आली आहे.
का झाली होती अटक?
क्लिनिकल सायकोलॉजीची बनावट पीएचडी डिग्री मिळवून रुग्णालयात नोकरी मिळवल्या प्रकरणी याचिकाकर्त्या महिलेस अटक करण्यात आली होती. 26 मे रोजी मुंबईच्या वांद्रे पोलीस ठाण्यात कलम 419 (वेषांतर करून फसवणूक), 420 (फसवणूक), 467 (बनावट करणे) आणि 468 (फसवणूकीच्या हेतूने बनावट) अन्वये तिच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. कागदपत्रांनुसार, छत्रपती शाहूजी महाराज विद्यापीठ, कानपूर येथील 2009 मध्ये जारी केलेले याचिकाकर्त्या महिलेचे पीएचडी प्रमाणपत्र बनावट असल्याचे लक्षात आले आहे.
संजय राऊत यांच्यावर केले आरोप-
शिवसेनेचे मुखपत्र 'सामना' चे सहसंपादक आणि संजय राऊत गेली आठ वर्षे आपल्या बळाचा वापर करत आहेत. ते माझ्यासह कुटुंबीय आणि नातेवाईकांवर अत्याचार करत आहेत. तसेच राऊत यांच्या सांगण्यावरूनच पोलिसांनी माझ्यावर 'वेश्या व्यवसाय' केल्याचा आरोप केला, असा दावा तक्रारदार महिलेने केला होता. तसेच 2017 मध्ये संजय राऊत यांनी स्वत: फोनवरून धमकी दिली होती आणि 2018 मध्ये त्यांनी एका माणसाला रीतसर कंत्राट देऊन तक्रारदार यांचा पाठलाग करायला लावला होता. याचिका कर्त्या महिलेच्या म्हणण्यानुसार त्यांचे सोशल मीडिया हँडल हॅक केले गेले आणि कधी सुसाईड नोट्स तर कधी अश्लील साहित्य पोस्ट केले गेले. परंतु या प्रकरणात संजय राऊत यांच्याविरूद्ध एफआयआर नोंदवू शकत नाही, असे पोलिसांनी स्पष्टपणे संबंधित तक्रारदार यांना सांगितले, असल्याचा पाटकर यांचा आरोप आहे.
पंतप्रधान मोदींना लिहिले होते पत्र
यावर्षी एप्रिलमध्ये याचिकाकर्त्या महिलेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून न्याय देण्याची मागणी केली होती. स्वत: ला सुशिक्षित आणि बळकट भारतीय महिला म्हणून वर्णन करताना तिने पत्रात लिहिले की, तिला सहानुभूती नव्हे तर न्याय पाहिजे आहे. पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्रात असे म्हटले होते की, त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना 'शिवसेना भवन' च्या तिसर्या मजल्यावर बोलावून मारहाण केली. त्याला त्यांच्याशी संपर्क तोडण्यास भाग पाडले गेले. यासह सर्व काही संपवण्यासाठी 4 कोटी रुपयांच्या वसुलीचा प्रस्ताव ठेवल्याचा आरोपही करण्यात आला.
संजय राऊत यांच्या विरोधात महिलेने केलेल्या आरोपांची चौकशी करा; उच्च न्यायालयाचे निर्देश - Sena MP Sanjay Raut
तक्रारदार महिलेने आरोप केले की 2017 मध्ये संजय राऊत यांनी स्वत: फोनवरून धमकी दिली होती आणि 2018 मध्ये त्यांनी एका माणसाला रीतसर कंत्राट देऊन तक्रारदार महिलेचा पाठलाग करायला लावला होता. तसेच त्यांचे सोशल मीडिया हँडल हॅक केले गेले आणि कधी सुसाईड नोट्स तर कधी अश्लील साहित्य पोस्ट केल्या .
पत्रात पुढे लिहिले की, “जेव्हा पोलिसांद्वारे चौकशी करूनही संजय राऊत यांच्या राक्षसी आनंदाचे समाधान होत नाही, तेव्हा मला त्रास, छळ व बदनामी केली जाते. ते म्हणतात की आपण पोलिसांकडे गेलात तरी काहीही होणार नाही. 2013 मध्ये माझ्यावर दोनदा हल्ला झाला. अद्याप तपास सुरू आहे. कोणताही आरोपी सापडला नाही. संजय राऊत यांच्याकडून खंडणी मागितल्याचा माझ्यावर आरोप होता. मला धमक्या दिल्या, मी कोणाशी बोलते आणि कोणाशी बोलत नाही यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. मी कुठे जात आहे, मी काय करीत आहे - संजय राऊत सर्वांची माहिती घेत असतात. मी कुठे गेली आणि कोणास भेटली हे सांगण्यासाठी मला दररोज ईमेल पाठवावे लागले आणि मी न ऐकल्यास नवीन पोलीस केस बनवण्यात येत असते" असेही आरोप करण्यात आले आहेत.