मुंबई - हिंदी चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या पायल घोष हिच्या विरोधात अभिनेत्री रिचा चढ्ढा हिने तब्बल एक कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. यासंदर्भात पायल घोषला रिचा चढ्ढातर्फे कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे.
रिचा चढ्ढाने ठोकला अभिनेत्री पायल घोष विरोधात 1 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा - payal ghosh defamation case
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री पायल घोष हिने केलेल्या आरोपांमध्ये अनुराग कश्यपवर गंभीर आरोप करण्यात आले होते. रिचा चढ्ढा, हुमा कुरेशी व माही गिल यांसारख्या अभिनेत्रींनी काम मिळण्यासाठी अनुराग कश्यपसोबत शारीरिक संबंध ठेवल्याचा खळबळ जनक आरोप केला होता. यासंदर्भात पायल घोषला रिचा चढ्ढातर्फे कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री पायल घोष हिने अनुराग कश्यप यांच्यावर गंभीर आरोप केले होते. रिचा चढ्ढा, हुमा कुरेशी व माही गिल यांसारख्या अभिनेत्रींनी काम मिळण्यासाठी अनुराग कश्यपसोबत शारीरिक संबंध ठेवल्याचा ही आरोप पायलने केला होता. पायलने केलेल्या या आरोपांवर रिचाने आक्षेप घेतला होता. अखेर तीने उच्च न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे.
हिंदी चित्रपट सृष्टीत मी आजपर्यंत कमावलेल्या नावालाही अशाप्रकारच्या प्रकरणांमुळे धक्का लागला आहे. सोशल मीडियावर माझ्या संदर्भात बिनबुडाचे आरोप करणारे व्हिडिओ व मजकूर पसरवण्यात येत आहेत. त्यामुळेच अब्रुनुकसानीचा दावा केला असल्याचे रिचाने स्पष्ट केले. मुंबई उच्च न्यायालयात या संदर्भात येत्या 7 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.
दरम्यान, दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या विरोधात मुंबई पोलिसांच्या वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून काही दिवसांपूर्वी तब्बल आठ तासांहून अधिक वेळ त्याची चौकशी सुरू होती. पायल घोष हिच्याकडून अनुराग कश्यपच्या विरोधात लैंगिक शोषणाची तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी यासंदर्भात अनुराग कश्यप विरोधात गुन्हा दाखल केला होता.