मुंबई -गीतकार जावेद अख्तर आणि अभिनेत्री कंगना रनौत या दोघांमधील वाद सर्वश्रुत आहे. पासपोर्ट नूतनीकरणाच्या दरम्यान कंगनाने खोटी माहिती दिली आहे. तसंच गुन्ह्यांची माहिती देखील लपवली आहे. असा आरोप करत जावेद अख्तर यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र, मुंबई हायकोर्टाने जावेद अख्तर यांची हस्तक्षेप करणारी याचिका फेटाळून लावली आहे.
पासपोर्ट नुतनीकरण प्रकरण : जावेद अख्तर यांची कंगनाविरोधातली याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली - Javed Akhtar on Kangana Ranaut
मुंबई हायकोर्टाने जावेद अख्तर यांची कंगनाविरोधातली हस्तक्षेप करणारी याचिका फेटाळून लावली आहे.
जावेद अख्तर यांची वकील वृंदा ग्रोव्हर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंगना हिने कोर्टाला खोटी माहिती दिली आहे. पासपोर्ट नूतनीकरणाच्या प्रक्रियेसाठी योग्य माहिती देणे आवश्यक असतं. मात्र, कंगना हिने कोर्टाची फसवणूक केली आहे.
न्यायमूर्ती एस एस शिंदे आणि न्यायमूर्ती एन जे जमादार यांच्या बेंचने गीतकार जावेद अख्तर यांची याचिका फेटाळून लावली. सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती म्हणाले की, जर या याचिकेवर सुनावणी झाली तर अशा स्वरूपाच्या याचिकेनं संपूर्ण कोर्ट भरून जाईल. कोर्टाच्या आपल्या काही सीमा आहेत. असं न्यायमूर्ती म्हणाले.