मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळं नारायण राणे यांना संमेश्वरमध्ये अटक केली होती. रात्री उशिरा महाड कोर्टानं त्यांना जामीन दिला. मात्र, राणे यांच्या विधानामुळं काल महाराष्ट्रात दिवसभर शिवसेनेने आंदोलने केली. आता १७ सप्टेंबरपर्यंत नारायण राणेंना हायकोर्टाने दिलासा दिला आहे. तसेच तोपर्यंत कोणतीही कारवाई करणार नाही, अशी ग्वाही राज्य सरकारने हायकोर्टात दिली आहे.
हेही वाचा -केंद्रीय मंत्री राणेंची जनआशीर्वाद यात्रा पुढे ढकलली; सिंधुदुर्ग भाजप जिल्हाध्यक्षाची माहिती
- १७ सप्टेंबरपर्यंत कारवाई न करण्याचे आदेश -
उद्धव ठाकरे यांच्या विरोधात करण्यात आलेल्या वक्तव्यामुळे संबंधित सगळ्या गुन्ह्यांत पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याची मागणी कोर्टात केली होती. पण, याचिकेत केवळ नाशिक गुन्ह्याचा समावेश असल्याने याच प्रकरणात कारवाई न करण्याची सरकारची हमी सरकारी पक्षातर्फे देण्यात आली आहे. न्यायालयानेही सरकारचे म्हणणे मान्य करत, १७ सप्टेंबरपर्यंत कारवाई न करण्याचे आदेश दिले आहेत.