महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Kirit Somaiya in INS Vikrant : मुंबई उच्च न्यायालयाचा आयएनएस विक्रांत प्रकरणात सोमैय्या पितापुत्रांना दिलासा - anticipatory bail to Kirit Somaiya

मुंबई उच्च न्यायालयाचा आयएनएस विक्रांत प्रकरणात सोमैय्या पितपुत्रांना दिलासा ( Kirit Somaiya in INS Vikrant cheating case ) मिळाला आहे. उच्च न्यायालयाने दोघांनाही जामिन दिला आहे. तूर्तास आर्थिक घोटाळा केल्याचे कोणतेही पुरावे सापडले ( Bombay HC grants anticipatory bail ) नाहीत, अशी माहिती मुंबई पोलिसांची हायकोर्टात दिली आहे.

Kirit Somaiya in INS Vikrant cheating case
सोमैय्या पितापुत्रांना दिलासा

By

Published : Aug 10, 2022, 2:26 PM IST

Updated : Aug 10, 2022, 3:27 PM IST

मुंबई-मुंबई उच्च न्यायालयाचा आयएनएस विक्रांत प्रकरणात सोमैय्या पितपुत्रांना दिलासा ( Kirit Somaiya in INS Vikrant cheating case ) मिळाला आहे. उच्च न्यायालयाने दोघांनाही जामिन दिला आहे. तूर्तास आर्थिक घोटाळा केल्याचे कोणतेही पुरावे सापडले ( Bombay HC grants anticipatory bail ) नाहीत, अशी माहिती मुंबई पोलिसांची हायकोर्टात दिली आहे. किरीट सोमैय्यांची 17 ऑगस्टला तर नील सोमैय्यांची 18 ऑगस्टला आय एन एस विक्रांत प्रकरणात पुन्हा चौकशी होणार आहे.

भाजप नेते किरीट सौमया आणि पुत्र नील सौमैया यांना आयएनएस विक्रांत घोटाळा प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. सौमया पितापुत्रांना हा पैसा त्यांच्या निकॉन इन्फ्रा कंपनीत वळवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. आयएनएस विक्रांत घोटाळ्याप्रकरणी सौमया पितापुत्रांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. आयएनएस विक्रांतच्या नावाखाली भाजप नेते किरीट सोमैया यांनी हा घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला. हा पैसा त्यांनी 2014 ची निवडणूक लढवण्यासाठी आणि त्यांच्या निकॉन इन्फ्रा कंपनीत वळविला होता. हा घोटाळा करून किरीट सोमैया यांनी देशाच्या संरक्षणव्यवस्थेशी, राष्ट्रीय भावनेशी केलेली प्रतरणा केली आहे. त्यामुळे किरीट सोमैया यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी संजय राऊत यांनी केली होती.



आयएनएस विक्रांत प्रकरणात सोमैय्या पितपुत्रांना विरोधात तूर्तास आर्थिक घोटाळा केल्याचे कोणतेही पुरावे सापडले नाहीत, असे मुंबई पोलिसांची उच्च न्यायालयात म्हटले आहे. मात्र किरीट आणि नील सोमैय्या यांना अटक करण्यापूर्वी 72 तासांची नोटीस देन्याच उच्च न्यायालयाचे पोलिसांना निर्देश दिले आहे. मात्र मुंबई पोलिसां समोर या प्रकरणात चौकशी करता हजर राहण्याचे नवं समन्स जारी केला आहे. किरीट सोमय्यांची 17 ऑगस्टला तर नील सोमैय्यांची 18 ऑगस्टला आय एन एस विक्रांत प्रकरणात पुन्हा चौकशी होणार आहे.



काय आहे प्रकरण-शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी केले आहेत. तर किरीट सोमैय्या यांच्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आयएनएस विक्रांतवरून भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. तसेच INS विक्रांत निधी अपहार प्रकरणी किरीट सोमैया आणि त्यांचे सुपुत्र निल सोमैय्या यांना समन्स बजावण्यात आला होता. त्यानंतर अटकपूर्व जामीनासाठी सोमय्यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. यावर सुनावणी करत न्यायालयाने सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर किरीट आणि त्यांचा मुलगा नील सोमैया यांनी मुंबई उच्च न्यायाल्यात धाव घेतली. मुंबई उच्च न्यायालयाने दोघांना अंतरिम जामीन दिला होता. सोमैय्या यांच्या विरोधात या प्रकरणी मुंबईच्या ट्रॉमबे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Last Updated : Aug 10, 2022, 3:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details