महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Gangubai Kathiawadi Row : मुंबई उच्च न्यायालयाने गंगुबाई काठियावाडी विरोधातील फेटाळल्या याचिका; चित्रपट 25 फेब्रुवारीलाच प्रदर्शित होणार - Congress MLA Amin Patel

प्रदर्शनापूर्वीच चित्रपट निर्माता आणि निर्देशक संजय लीला भंन्साळी यांचा गंगुबाई काठियावाडी हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला ( Gangubai Kathiawadi movie controversy ) होता. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने ( Bombay High Court ) 'गंगूबाई काठियावाडी' ( Gangubai Kathiawadi ) चित्रपटाविरोधातील दोन याचिका फेटाळून लावल्या असून एक याचिका निकाली काढली आहे.

Gangubai Kathiawadi Row
Gangubai Kathiawadi Row

By

Published : Feb 23, 2022, 4:41 PM IST

Updated : Feb 23, 2022, 9:29 PM IST

मुंबई - मुंबई उच्च न्यायालयाने ( Bombay High Court ) 'गंगुबाई काठियावाडी' ( Gangubai Kathiawadi ) चित्रपटाविरोधातील दोन याचिका फेटाळून लावल्या असून आणि चित्रपटाविरोधातील आणखी एक याचिका निकाली काढली आहे. तसेच 'गंगूबाई काठियावाडी' चित्रपटाविरोधातील याचिका फेटाळल्यानंतर, मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, "चित्रपट 25 फेब्रुवारीला कोणत्याही अडथळ्याशिवाय प्रदर्शित होईल."

चित्रपट निर्माता आणि निर्देशक संजय लीला भंसाली यांचा गंगुबाई काठियावाडी हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला ( Gangubai Kathiawadi movie controversy ) आहे. हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच चित्रपटाविरोधात सोमवारी मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती जीएस पटेल यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने बुधवारी सुनावणी दिली.

काँग्रेसचे आमदार अमीन पटेल यांनी केली होती याचिका

काँग्रेसचे आमदार अमीन पटेल (Congress MLA Amin Patel ) यांनी गंगुबाई काठियावाडी या चित्रपटाच्या विरोधात याचिका दाखल ( Petition filed against Gangubai Kathiawadi movie ) केली आहे. ही जनहित याचिका सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात ( Mumbai High Court ) दाखल करण्यात आली आहे. आलिया भट्ट ही गंगुबाई काठियावाडी चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे. या चित्रपटाला विरोध करताना या चित्रपटाचे नाव बदलण्याची मागणी केली जात आहे. काठियावाडी नाव असल्याने सदर शहराची प्रतिमा मलिन होणार असं आमदार पटेल यांनी म्हटले आहे. पटेल यांनी आरोप केला आहे की, कामाठीपुरा हा मोठा परिसर आहे त्यात फक्त एक, दोन गल्ली मध्ये रेड लाईट एरिया आहे. म्हणून संपूर्ण कामाठीपुराचा नाव खराब होणं हे योग्य नाही. असेही यात नमूद करण्यात आले आहे.

गंगुबाईच्या मुलाने सुध्दा केली होती तक्रार -

गंगुबाईच्या मुलाने सुध्दा याबाबत प्रकार दाखल केली होती. पंरतु मुंबई उच्च न्यायालयाकडून या प्रकऱणाला स्थगिती देण्यात आली. या चित्रपटात गंगुबाईसाठी काही अपमानास्पद शब्द वापरण्यात आले होते. तसेच हा चित्रपट द माफिया क्वीन ऑफ मुंबई ( The Mafia Queen of Mumbai ) या कांदबरीबर आधारीत आहे. कामाठीपुरा येथील 55 रहिवाशांच्या वतीने एका महिलेने याचिका दाखल केली होती. या चित्रपटामुळे या परिसरात राहणाऱ्या सर्व मुलींना वेश्या ठरवले जाईल, त्यांची छेडछाड आणि टोमणे मारले जातील, आणि कुटुंबांना कमी सन्मानाने जगावे लागेल, असे याचिकेत म्हटले आहे. सर्व निष्पक्षता, समानता आणि न्यायाचे उल्लंघन केले गेले आहे, असे याचिकेत आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे चित्रपटातील 'कामाठीपुरा' या नावाचा वापर करण्याचे सर्व संदर्भ काढून टाकण्यासाठी, चित्रपटाच्या प्रदर्शनावर आणि सेन्सॉर बोर्डाकडे दिग्दर्शनास स्थगिती देण्याची मागणी याचिकेत करण्यात आली होती.

हेही वाचा -Special interview with Gangubai Family : 'गंगु माँ'ची खरी ओळख पुसण्याचा प्रयत्न होतोय - कुटुंबीयांचा आरोप

Last Updated : Feb 23, 2022, 9:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details