मुंबई -बॉम्बे हायकोर्टाच्या प्रशासकीय समितीने राज्यातील कोविड स्थितीमध्ये होणारी सुधारणा पाहून 2 ऑगस्ट 2021 पासून प्रत्यक्ष सुनावणी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी झालेल्या प्रशासकीय समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला मुख्य न्यायाधीश दिपांकर दत्ता तसेच इतर न्यायाधीश आणि उच्च न्यायालयाच्या सर्व संघटनांनी सहभाग घेतला होता. प्रशासकीय समितीने सांगितले की लसीकरणामध्ये झालेली वाढ आणि त्याचबरोबर कोविड रुग्णांची घटणारी संख्या पाहता प्रत्यक्ष कामकाज सुरु होऊ शकते.
प्रिन्सिपल सीटद्वारे घेतलेले मुद्दे -
- प्रत्येक बेंच 4 दिवस सुनावणी करेल, चारपैकी तीन दिवस शारीरिक उपस्थिती द्वारे सुनावणी करेल.
- सगळ्या कॉर्ट रूममध्ये फुली हायब्रीड सिस्टीम लागू करण्यासंदर्भात पावले उचलली जाणार.
- वादी आणि प्रतिवादी यांना कोर्टाच्या आवारात तेव्हाच परवानगी असेल जेव्हा कोर्टात त्यांची उपस्थिती आवश्यक असेल.