मुंबई - बॉलीवूड ड्रग्स सिंडिकेटप्रकरणी तपास करणाऱ्या एनसीबीच्या पथकाने राहिला फर्निचरवाला आणि करण सजनानीला पुन्हा अटक केली आहे. या प्रकरणी सहायक दिग्दर्शक ऋषीकेश पवार यालाही पथकाने आधी अटक केली होती. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतला अमली पदार्थ पुरविल्या प्रकरणी त्याला अटक करण्यात आलेली आहे.
बॉलीवूड ड्रग्स सिंडिकेट प्रकरण: राहिला फर्निचरवाला, करण सजनानीला एनसीबीकडून पुन्हा अटक - rahila farnicherwala
ऋषीकेशला अटक केल्यानंतर त्याने चौकशीदरम्यान करण सजनानी, राहिला फर्निचरवाला, करण सजनानी आणि जगदीप आनंद सिंग यांची नावं घेतली होती.
![बॉलीवूड ड्रग्स सिंडिकेट प्रकरण: राहिला फर्निचरवाला, करण सजनानीला एनसीबीकडून पुन्हा अटक बॉलीवूड ड्रग्स सिंडिकेट प्रकरण: राहिला फर्निचरवाला, करण सजनानीला एनसीबीकडून पुन्हा अटक](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-10506051-696-10506051-1612498874065.jpg)
ऋषीकेश पवारच्या चौकशीतून आली नावे समोर
सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमधील ड्रग्स सिंडिकेटचा तपास एनसीबीकडून केला जात आहे. यादरम्यान सुशांतला अमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या ऋषीकेश पवार याचे नाव समोर आले. सुशांतच्या घरी काम करणाऱ्या दीपेश सावंत याने ऋषीकेश पवार याचं नाव घेतलं होतं. यानंतर ऋषीकेश पवार हा फरार झाला होता. ऋषीकेशला अटक केल्यानंतर त्याने चौकशीदरम्यान करण सजनानी, राहिला फर्निचरवाला आणि जगदीप आनंद सिंग यांची नावं घेतली होती.
फर्निचरवाला आणि सजनानी आधीच अटकेत
राहिला फर्निचरवाला आणि करण सजनानीला याआधीच एका प्रकरणात अटक करण्यात आलेली असून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आलेली होती. त्यानंतर या आरोपींचा ताबा घेऊन त्यांना आता या नव्या प्रकरणात अटक करण्यात आलेली आहे.