मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने (Urmila Matondkar) अवघ्या 14 दिवसांत कोरोनावर मात केली आहे. नुकतेच त्यांनी कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती दिली होती. त्यानंतर त्यानी सोशल मीडियावर सांगितले होते की, त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करावी. तसेच या साथीचा सामना करण्यासाठी कोरोना लस लवकरात लवकर घ्यावी, अशी विनंतीदेखील त्यांनी केली होती. आता उर्मिलाने पुन्हा एकदा सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून तिची अवस्था सांगितली आहे. यासोबतच त्यांचा तपास अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती त्यांनी दिली.
बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांची अवघ्या 14 दिवसांत कोरोनावर मात - Urmila Matondkar
अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी काही दिवसांपूर्वी आपला कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती दिली होती. गेल्या अवघ्या 14 दिवसांत कोरोनावर मात केली आहे.

उर्मिला मातोंडकर
कोरोना नियम पाळण्याचे अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांचे नागरिकांना आवाहन
उर्मिला मातोंडकरने 31 ऑक्टोबर रोजी ट्विट करून कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली होती. 'मला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळले आहे. मी ठीक आहे आणि होम क्वारंटाईनमध्ये आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांनी त्वरित कोरोना चाचणी करावी, असे आवाहन कंगनाने केले होते.
Last Updated : Nov 17, 2021, 8:52 AM IST