महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Fraud With Rajkumar Rao : राजकुमार रावच्या पॅनकार्डचा वापर करुन 'इतक्या' रुपयांची फसवणूक - राजकुमार रावची फसवणूक

अभिनेता राजकुमार रावला आर्थिक फटका बसला ( Fraud With Rajkumar Rao ) आहे. राजकुमार रावच्या पॅनकार्डचा गैरवापर करून 2 हजार 500 रुपयांचे कर्ज घेतले आहे. त्याबाबात त्याने तक्रार दिली आहे.

Rajkumjar Rao
Rajkumjar Rao

By

Published : Apr 2, 2022, 11:04 PM IST

मुंबई -आर्थिक फसवणुकीची अनेक प्रकरणे आतापर्यंत झाली आहेत. गुन्हेगार वेगवेगळ्या क्लुप्त्यांचा वापर करुन नागरिकांची फसवणूक करतात. त्यात आता बॉलिवूड अभिनेता राजकुमार रावला देखील याचा फटका बसला आहे. राजकुमार रावची आर्थिक फसवणुक झाली ( Fraud With Rajkumar Rao ) आहे.

राजकुमार रावने याबाबतची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. ट्विट करत राजकुमार म्हणाला की, अज्ञात व्यक्तीने माझ्या पॅनकार्डचा गैरवापर करून 2 हजार 500 रुपयांचे कर्ज घेतले आहे. यामुळे यामुळे माझा क्रेडिट स्कोर खराब होईल. क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेडने यासंबंधीत चौकशी करा आणि यापुढे, असे होणार नाही याची काळजी घ्या.

दरम्यान, राजकुमार राव लवकरत मोनिका ओह माय डार्लिंग, भीड, मिस्टर अँड मिसेस माही' आणि हिटसारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. राजकुमार शेवटचा 11 फेब्रुवारीला रिलीज झालेल्या बधाई दो मध्ये दिसला होता. या चित्रपटात त्याच्यासह भूमी पेडणेकरही मुख्य भूमिकेत दिसली होती.

हेही वाचा -Malaika Arora Car Accident : अभिनेत्री मलाइका अरोराच्या गाडीचा अपघात; मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात दाखल केले

ABOUT THE AUTHOR

...view details