मुंबई - येथील गुन्हे शाखेच्या युनिट ७ ने रमाबाई कॉलनी, आंबेडकर नगर घाटकोपर परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून डॉक्टरसह ३ बनावट डॉक्टरांना अटक केली. हे सर्व बोगस डॉक्टर लोकांच्या जीवाशी खेळत आहेत. कोणताही वैद्यकीय अभ्यास न करता स्वतःचे दवाखाने उघडून त्याचा फायदा घेत होते.
मुंबईत बोगस डॉक्टरांना अटक, गुन्हे शाखेची मोठी कारवाई
गुन्हे शाखेच्या युनिट ७ ने रमाबाई कॉलनी, आंबेडकर नगर घाटकोपर परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून डॉक्टरसह ३ बनावट डॉक्टरांना अटक केली. हे सर्व बोगस डॉक्टर लोकांच्या जीवाशी खेळत आहेत. कोणताही वैद्यकीय अभ्यास न करता स्वतःचे दवाखाने उघडून त्याचा फायदा घेत होते.
मुंबईत बोगस डॉक्टरांना अटक
वैद्यकीय व्यवसाय अधिनियम १९६१ अंतर्गत कारवाई
गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना गुप्त माहिती मिळाली होती, त्यानंतर गुन्हे शाखेचे अधिकारी बोगस रुग्ण बनले आणि बनावट डॉक्टरांना रंगेहाथ उपचार करताना अटक करण्यात आली. दरम्यान, या सर्व बोगस डॉक्टरांच्या विरोधात महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम १९६१ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.