मुंबई: बनावट शपथपत्र Forgery Affidavit Case तयार केल्याप्रकरणी निर्मल नगर पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल करण्यात case registered आला आहे. या कारवाईत ४ हजार ६८२ प्रतिज्ञापत्रे पोलिसांना आढळून आली आहेत. मुंबई पोलिसांनी Mumbai Police अशाप्रकारे कारवाई माेहिम आणि अंधेरी येथेही केली आहे. आरोपींनी बनावट शिक्क्यांचा वापर केल्याचा संशय असून याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान याप्रकरणात कोणत्या राजकीय पक्षाच्या सहभाग आहे. याबाबत पोलिसांकडून कोणताही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. याबाबत तपास सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
प्रतिज्ञापत्रावर शिक्के मारण्याचे काम सुरू चुनाभट्टी येथील रहिवासी संजय कदम यांच्या तक्रारीवरून निर्मलनगर पोलीस ठाण्यात फसवणूक आणि बनावट कागदपत्र तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कदम यांच्या तक्रारीनुसार वांद्रे न्यायालय परिसरातील एका कार्यालयात हा धक्कादायक प्रकार सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. या ठिकाणी नोटरीचे काम सुरू होते. मात्र समोर कोणताही व्यक्ती उपस्थित नसतानाही प्रतिज्ञापत्रावर शिक्के मारण्याचे काम सुरू होते.
निर्मलनगर पोलिस पुढील तपास करत आहे दरम्यान कदम यांनी पोलिसांना सांगितले असता, तेथील काही व्यक्तींकडे मोठ्या प्रमाणात प्रतिज्ञापत्र असल्याचे दिसून आले आहे. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या सदस्यांनी पक्षाच्या नोंदणीबाबत बहुमत सिद्ध करण्यासाठी आणि पक्षाचे चिन्ह आपल्याकडे ठेवण्यासाठी ही बनावट शपथपत्रे निवडणूक आयोगासमोर सादर केल्याचा संशय आहे. मात्र अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून निर्मलनगर पोलिस पुढील तपास करत आहेत.
बोगस शपथपत्र तयार करत असल्याची माहितीपोलिसांनी त्या व्यक्तींना विचारले असता, त्यांच्याकडून कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. शेवटी या प्रकरणी पोलिसांनी त्या नोटरी करणाऱ्या व्यक्तींकडून ४ हजार ६८२ प्रतिज्ञापत्र जप्त करण्यात आले आहे. आधार कार्डाची प्रत आणि छायाचित्र मुद्रांकावर चिकटवून बोगस शपथपत्र तयार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी माहिम आणि अंधेरी येथे देखील कारवाई करण्यात आली आहे. या शपथपत्रांचा वापर कोणत्या राजकीय पक्षाकडून करण्यात येत असल्याबाबत पोलीस तपास करत आहेत.