मुंबई - प्रसिद्ध गायक केके उर्फ कृष्णकुमार कुन्नथ ( Krishnakumar Kunnath ) यांचे अचानक कोलकातामध्ये निधन झाले. कोलकात्याच्या नजरुल मंच ऑडिटोरियममध्ये परफॉर्मन्स करताना असताना अचानक त्यांची तब्येत ढासळली. तब्येत ढासळल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, रस्त्यातच त्यांना मृत्यूने गाठले. त्यानंतर आता त्यांचे पार्थिव मुंबईतील निवासस्थानी दाखल झाले आहे. उद्या त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार असून, सकाळी त्यांच्या पार्थिवावर वर्सोवातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहे. दिवंगत गायक केके यांचे पार्थिव आज सकाळी 10.30 ते 12.30 या वेळेत त्यांच्या निवासस्थानी पार्क प्लाझा येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून, त्यानंतर दुपारी 1 वाजता वर्सोवा येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
केके यांचे कोलकात्यामध्ये एकापाठोपाठ एक, असे दोन कार्यक्रम होते. तेव्हा नजरुल मंच ऑडिटोरियममध्ये परफॉर्मन्स करतेवेळी त्यांची तब्येत बिघडली. गर्दी वाढणे, एसी कमी असल्यामुळे त्यांना श्वास घेण्याचा त्रास झाला. त्यामुळे त्यांची प्रकृती ढासळली. त्यांना त्यानंतर हॉटेलमध्ये नेण्यात आलं. पण, प्रकृती ढासळल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. तेव्हा रस्त्यात त्यांचा मृत्यू झाला.