मुंबई : एकीकडे केंद्र आणि राज्य सरकार जलवाहतुकीला प्रोत्साहन देण्याचे काम करत आहे. तर, दुसरीकडे मुंबई पोस्ट ट्रस्टच्या भोंगळ्या कारभारामुळे मुंबईतील समुद्र सुरक्षा धोक्यात आली आहे. रे रोड येथील दारूखाना धक्क्यावर जुन्या बोटी तोडण्याचे काम सुरु Boat breaking work on MumbaiDarukhana Dhakka आहे. या बोटीतून होत असलेल्या तेलगळीमुळे समुद्रातील पर्यावरणाची मोठी हानी होत marine life in danger due to oil spill आहे.
बंदरावर चालते दुरुस्तीचे काम -मुंबईत इतर दळवळणाच्या साधनाच्या तुलनेत जलवाहतूक किफायतशीर आहे. त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकारांकडून जलवाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या प्रमाणात समुद्र किनाऱ्यावर धक्क्यांची उभारणी केली जात आहे. मात्र मुंबईतल्या दारूखाना धक्क्याची दुर्दशा झाली आहे. हळूहळू हे जुन्या बोटी तोडण्याचे केंद्र बनले आहे. पोर्ट ट्रस्टच्या अख्यतारीत येत असलेल्या या धक्क्यावर बोटी दुरुस्तीचे व जुन्या बोटी तोडण्याचे काम सुरु Boat breaking work marine life in danger आहे.
बोटीचे तेल समुद्रात -सध्या मुंबईत भाऊचा धक्का ते रेवस, भाऊचा धक्का ते उरण, गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा या सारख्या सर्व जलमार्गावर २०० पेक्षा जास्त फेरी बोटी चालतात. दररोज या बोटीतून हजारों प्रवासी प्रवास करतात. या बोटीची नियमितपणे देखभाल दुरुस्ती व्हावी, या उद्देशाने 'रे रोडे येथील दारूखाना धक्का बांधला. या धक्क्याची दुर्दशा झाली आहे. आयुष्य संपलेल्या बोटींवर हातोडा मारला जात असून या बोटीतले तेल समुद्रात जात आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जल प्रदूषण होत marine life Mumbai आहे. दुसरीकडे या धक्क्यावर गेले कित्येक वर्षापासून गाळ साचला आहे, तो उपसला जात नसल्यामुळे देखभाल दुरुस्तीसाठी इथे फेरी बोटी घेऊन जाण्यासाठी बोटी मालकांना भरतीची प्रतीक्षा करावी लागते.
समुद्रातील जीवदृष्टीला धोका -इथले स्थानिक फेरीबोट व्यावसायिक व पर्यावरण प्रेमी इकबाल मुकादम सांगतात की, बोटी तोडत असल्यामुळे तेल समुद्रात जात आहे. त्यामुळे समुद्रातील जीवसृष्टीला धोका निर्माण झालेला आहे. बोटींचा कचरासुद्धा समुद्रात जात असल्याने मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होत असल्याने पर्यावरणाची मोठी हानी होत आहे.