मुंबई -दुकाने आणि आस्थापनांची नावे मराठीत ( Display Marathi Boards ) असावीत असा निर्णय राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेने घेतला ( BMC will take action against shops ) आहे. या नियमांची अंमलबजावणी न करणाऱ्या दुकानांवर कारवाई केली जाणार आहे. यामुळे मुंबईमधील तब्बल पाच लाख दुकानदार पालिकेच्या रडारवर आले आहेत.
मराठी पाट्या बंधनकारक -देशाची आर्थिक राजधानी आणि जागतिक दर्जाचे शहर म्हणून मुंबईची ओळख आहे. मुंबईत सर्वभाषिक नागरिक राहत असून परदेशी पर्यटकही येत असतात. यामुळे बहुतेक दुकाने आणि आस्थापनांची नावे विशेष करून इंग्रजी भाषेत लिहिली जात होती. याविरोधात राजकीय पक्षांनी मराठीत नावे करण्याची मागणी केली. त्यावर राज्य सरकाराने सर्व दुकाने आणि आस्थापनांची नावे मराठीत करण्याचा निर्णय घेतला आहे.