महाराष्ट्र

maharashtra

मुंबई : २२७ नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये सुरू होणार लसीकरण केंद्र

By

Published : Apr 29, 2021, 7:44 PM IST

२२७ नगरसेवकांच्या वॉर्डमध्ये सुरू होणाऱ्या लसीकरण केंद्राबाबत नगरसेवकांशी संपर्क साधला असता पालिका प्रशासनाने आमच्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्क साधलेला नसल्याची माहिती शिवसेनेचे घाटकोपर येथील वॉर्ड क्रमांक १३० चे नगरसेवक सुरेश पाटील यांनी सांगितले. तसेच भाजपचे वॉर्ड क्रमांक १२९ चे सूर्यकांत गवळी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी संगितले.

लसीकरण
लसीकरण

मुंबई -महापालिकेकडून२२७ नगरसेवकांच्या विभागात लसीकरण केंद्र सुरू केले जाणार आहे. मात्र, यापासून नगरसेवक अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे. पालिका प्रशासनाने याबाबत नगरसेवकांशी कोणत्याही प्रकारचा संपर्क साधलेला नाही. मात्र, हेल्थ पोस्ट, दवाखाने, पालिका शाळा, सभागृहे आदी ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करावीत अशी मागणी नगरसेवकांकडून करण्यात आली आहे.

मुंबईमध्ये गेले वर्षभर कोरोनाचा प्रसार आहे. हा प्रसार काही प्रमाणात कमी होत असताना १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर, ६० वर्षावरील वयोवृद्ध नागरिक, ४५ ते ५९ वयामधील नागरिक यांचे लसीकरण केले जात आहे. मे महिनाअखेरपर्यंत १८ ते ४५ वर्षामधील नागरिकांचे लसीकरण सुरू होण्याची शक्यता आहे.

२२७ नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये सुरू होणार लसीकरण केंद्र

हेही वाचा-पंकजा मुंडेंना कोरोनाची लागण, धनंजय मुंडेंची भावनिक पोस्ट

मुंबईमधील २२७ नगरसेवकांच्या वॉर्डमध्ये प्रत्येकी एक लसीकरण केंद्र

मुंबईमधील लसीकरण केंद्र वाढविली जाणार आहेत. सध्या मुंबईत १३६ लसीकरण केंद्र आहेत. त्यात पालिका आणि सरकारी ६३ तर ७३ खासगी लसीकरण केंद्र आहेत. २६ खासगी केंद्रासाठी अर्ज प्राप्त झाल्याने ही संख्या ९९ इतकी होणार आहे. तसेच मुंबईमधील २२७ नगरसेवकांच्या वॉर्डमध्ये प्रत्येकी लसीकरण केंद्र सुरू केले जाणार आहे, अशी माहिती पालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी दिली आहे.

हेही वाचा-परमबीर सिंह यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा, जाणीवपूर्वक त्रास दिल्याचा पोलिस अधिकाऱ्याचा आरोप


नगरसेवकांशी संपर्क नाही -
२२७ नगरसेवकांच्या वॉर्डमध्ये सुरू होणाऱ्या लसीकरण केंद्राबाबत नगरसेवकांशी संपर्क साधला असता पालिका प्रशासनाने आमच्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्क साधलेला नसल्याची माहिती शिवसेनेचे घाटकोपर येथील वॉर्ड क्रमांक १३० चे नगरसेवक सुरेश पाटील, भाजपचे वॉर्ड क्रमांक १२९ चे सूर्यकांत गवळी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी संगितले. पालिकेने संपर्क साधला नसला तरी सुरेश पाटील यांनी संरक्षण मंत्रालयाच्या जागेवर असलेल्या सभागृहात लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी त्यांनी केली आहे. सूर्यकांत गवळी यांनी पालिकेच्या शाळांमध्ये लसीकरण सुरू करण्याची मागणी केली आहे. तर राखी जाधव यांनी पालिकेच्या हेल्थ पोस्ट आणि दवाखान्यांमध्ये लसीकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी केली आहे.

हेही वाचा-प्राणवायूच्या बचतीसाठी नंदुरबार पॅटर्न; राज्यभरात राबवणार 'ऑक्सिजन सिस्टर'चा यशस्वी प्रयोग

या आहेत नगरसेवकांच्या मागण्या -
मुंबईत १८ ते ४५ वयोगटातील ९० लाख लाभार्थी आहेत. पालिका प्रत्येक नगरसेवकांच्या प्रभागात लसीकरण केंद्र सुरू करणार आहे. एका नगरसेवकाच्या प्रभागात ५० ते ५५ हजार मतदार असतात. त्यात १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांची संख्या मोठी आहे. यामुळे लसीकरणाला गर्दी होणार आहे. त्यासाठी लोकांना रांगा लावता येतील, अशी मोठी जागा असावी. लसीकरण करण्यासाठी प्रशस्त अशी जागा असावी. लसीकरणानंतर अर्धा तास निरीक्षण करता यावे यासाठी निरीक्षण कक्ष त्याठिकाणी असावा. तसेच लसीकरणादरम्यान काही दुष्परिणाम झाल्यास त्यांना त्वरित उपचार करण्याची व्यवस्था त्याठिकाणी असावी अशा जागांवरच लसीकरण केंद्र उभारली जावीत, अशी मागणी नगरसेवकांची आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details