मुंबई- कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांना मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये यश मिळत आहे. त्यामध्ये कोणतीही कमतरता राहू नये, म्हणून महापालिकेने आता “मिशन युनिव्हर्सल टेस्टिंग” हाती घेतले आहे. यातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे अवघ्या अर्ध्या तासात कोरोना चाचणीचा अहवाल देणाऱ्या अँटीजेन टेस्टिंगच्या एक लाख कीट खरेदी करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. तसेच ७० वर्ष वयावरील ज्येष्ठ नागरिकांना प्रीस्क्रीप्शनशिवाय घरीच चाचणी करुन घेण्याची परवानगी दिल्याची माहिती पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली.
महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी विविध वैद्यकीय प्रयोगशाळांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. या बैठकीमध्ये महानगरपालिका आयुक्त चहल यांनी कोरोना चाचणीबाबतचे महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.
काय आहे ॲन्टीजेन टेस्टींग
राज्य सरकारने २२ जूनला सरकारी निर्णय प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद यांनी मान्यता दिलेल्या एसडी बायोसेन्सर या एकमेव कंपनीच्या कीटद्वारे ॲन्टीजेन टेस्टींग करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सध्याच्या आरटीपीसीआर या एकमेव निदान चाचणीच्या तुलनेत ही चाचणी अतिशय वेगवान अहवाल देणारी आहे. त्याचा उपयोग करुन कोरोना हॉटस्पॉट किंवा प्रतिबंधात्मक क्षेत्रामध्ये तसेच अति जोखमीच्या आणि कोरोनासह इतर आजार असलेल्या रुग्णांची चाचणी करुन तातडीने अहवाल मिळणार आहे. या चाचणीचा अहवाल १५ ते ३० मिनिटांच्या आत प्राप्त होत असल्याने बाधित रुग्णांवर तातडीने उपचार करणे शक्य होणार आहे.
महापालिकेने सरकारच्या निर्णयानुसार ॲन्टीजेन कीटच्या १ लाख कीट खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच या कीट उपलब्ध होणार आहेत. हे कीट मुंबईतील महानगरपालिकेची सर्व रुग्णालये, राज्य सरकारची रुग्णालये तसेच कोरोना उपचार केंद्र आदी ठिकाणी उपयोगात येणार आहेत. यातून लक्षणे दिसत असलेल्या संशयितांची तातडीने चाचणी करून संसर्गाला रोखण्याची उपाययोजना अतिशय वेगवान होईल. दरम्यान, मुंबई महापालिका क्षेत्रातील ३५ मोठ्या खासगी रुग्णालयांनीदेखील या ॲन्टीजेन टेस्ट कीट खरेदी कराव्यात आणि त्याचा उपयोग करण्याकरता महानगरपालिका प्रशासनाने रुग्णालयांना विनंती केली आहे.
चाचण्यांची संख्या वाढणार -
केवळ संशयित असलेल्या व्यक्तीच नव्हे तर, कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या अत्यंत जवळच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींचीदेखील चाचणी करण्याची क्षमता वाढवली जाणार आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) यांच्या निर्देशानुसार अति जोखीम गटातील व्यक्तींची ५ ते १० दिवसांमध्ये चाचणी करण्यात येते. अशा व्यक्तींच्या प्रतिदिन सुमारे २ हजार अतिरिक्त चाचण्या आता केल्या जातील. यामुळे सध्याच्या सरासरी साडेचार हजार आणि अतिरिक्त २ हजार अशा सुमारे साडेसहा हजार चाचण्या घेण्यात येणार आहेत.
कुठूनही चाचणी करा -
कोरोनाबाधित रुग्णाच्या अत्यंत नजीकच्या संपर्कात असलेल्या अतिजोखीम असलेल्या व्यक्तीला घरी अलगीकरणात असल्यास, त्यांना कोणत्याही वैद्यकीय प्रयोगशाळेतून चाचणी करुन घेण्याचीही मुभा देण्यात आली आहे. महापालिकेच्या सर्व २४ विभाग कार्यालयांसाठी प्रत्येकी १ वैद्यकीय प्रयोगशाळा संलग्न करण्यात आली आहे. मात्र, अतिजोखीम गटातील अशा व्यक्तींना विभाग कार्यालयांशी संलग्न लॅब व्यतिरिक्त इतर लॅबमधूनही स्वत:ची चाचणी करुन घेता येईल. त्यासाठी प्रयोगशाळांनादेखील तशी चाचणी करण्याची मुभा देण्यात आली आहे.
कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांना मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये यश मिळत आहे. त्यामध्ये कोणतीही कमतरता राहू नये म्हणून महापालिकेने आता “मिशन युनिव्हर्सल टेस्टिंग” हाती घेतले आहे. यातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे अवघ्या अर्ध्या तासात कोरोना चाचणीचा अहवाल देणाऱ्या अँटीजेन टेस्टिंगच्या एक लाख कीट खरेदी करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. तसेच ७० वर्ष वयावरील ज्येष्ठ नागरिकांना प्रीस्क्रीप्शनशिवाय घरीच चाचणी करुन घेण्याची परवानगी दिल्याची माहिती पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली.
महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी विविध वैद्यकीय प्रयोगशाळांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. या बैठकीमध्ये महानगरपालिका आयुक्त चहल यांनी कोरोना चाचणीबाबतचे महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.
काय आहे ॲन्टीजेन टेस्टींग?
राज्य सरकारने २२ जूनला सरकारी निर्णय प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद यांनी मान्यता दिलेल्या एसडी बायोसेन्सर या एकमेव कंपनीच्या कीटद्वारे ॲन्टीजेन टेस्टींग करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सध्याच्या आरटीपीसीआर या एकमेव निदान चाचणीच्या तुलनेत ही चाचणी अतिशय वेगवान अहवाल देणारी आहे. त्याचा उपयोग करुन कोरोना हॉटस्पॉट किंवा प्रतिबंधात्मक क्षेत्रामध्ये तसेच अति जोखमीच्या आणि कोरोनासह इतर आजार असलेल्या रुग्णांची चाचणी करुन तातडीने अहवाल मिळणार आहे. या चाचणीचा अहवाल १५ ते ३० मिनिटांच्या आत प्राप्त होत असल्याने बाधित रुग्णांवर तातडीने उपचार करणे शक्य होणार आहे.
महापालिकेने सरकारच्या निर्णयानुसार ॲन्टीजेन कीटच्या १ लाख कीट खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच या कीट उपलब्ध होणार आहेत. हे कीट मुंबईतील महानगरपालिकेची सर्व रुग्णालये, राज्य सरकारची रुग्णालये तसेच कोरोना उपचार केंद्र आदी ठिकाणी उपयोगात येणार आहेत. यातून लक्षणे दिसत असलेल्या संशयितांची तातडीने चाचणी करून संसर्गाला रोखण्याची उपाययोजना अतिशय वेगवान होईल. दरम्यान, मुंबई महापालिका क्षेत्रातील ३५ मोठ्या खासगी रुग्णालयांनीदेखील या ॲन्टीजेन टेस्ट कीट खरेदी कराव्यात आणि त्याचा उपयोग करण्याकरता महानगरपालिका प्रशासनाने रुग्णालयांना विनंती केली आहे.
चाचण्यांची संख्या वाढणार -
केवळ संशयित असलेल्या व्यक्तीच नव्हे तर, कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या अत्यंत जवळच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींचीदेखील चाचणी करण्याची क्षमता वाढवली जाणार आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) यांच्या निर्देशानुसार अति जोखीम गटातील व्यक्तींची ५ ते १० दिवसांमध्ये चाचणी करण्यात येते. अशा व्यक्तींच्या प्रतिदिन सुमारे २ हजार अतिरिक्त चाचण्या आता केल्या जातील. यामुळे सध्याच्या सरासरी साडेचार हजार आणि अतिरिक्त २ हजार अशा सुमारे साडेसहा हजार चाचण्या घेण्यात येणार आहेत.
कुठूनही चाचणी करा -
कोरोनाबाधित रुग्णाच्या अत्यंत नजीकच्या संपर्कात असलेल्या अतिजोखीम असलेल्या व्यक्तीला घरी अलगीकरणात असल्यास, त्यांना कोणत्याही वैद्यकीय प्रयोगशाळेतून चाचणी करुन घेण्याचीही मुभा देण्यात आली आहे. महापालिकेच्या सर्व २४ विभाग कार्यालयांसाठी प्रत्येकी १ वैद्यकीय प्रयोगशाळा संलग्न करण्यात आली आहे. मात्र, अतिजोखीम गटातील अशा व्यक्तींना विभाग कार्यालयांशी संलग्न लॅब व्यतिरिक्त इतर लॅबमधूनही स्वत:ची चाचणी करुन घेता येईल. त्यासाठी प्रयोगशाळांनादेखील तशी चाचणी करण्याची मुभा देण्यात आली आहे.
प्रिस्क्रिप्शन शिवाय चाचणी -
तसेच, ७० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवायदेखील कोणत्याही वैद्यकीय प्रयोगशाळेकडून कोरोना चाचणी करून घेता येईल. ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेत असलेल्या कोणत्याही एका मदतनीसालादेखील आवश्यक असल्यास चाचणी करून घेण्याचा पर्याय दिला आहे. तर डॉक्टरांकडून फिजीकल प्रिस्क्रिप्शनऐवजी ई-प्रिस्क्रिप्शन मिळाले तरी त्याच्याआधारेदेखील नागरिकांच्या घरी जाऊन प्रयोगशाळांना चाचणी करून घेता येईल, असे निर्देशही आयुक्त चहल यांनी दिले आहेत.
अबॉट, रॉशच्या रॅपिड टेस्टींग कीट -
रॅपिड टेस्टींग कीट वापरासाठी सरकारने मान्यता दिली आहे. अबॉट आणि रॉश या कंपन्यांमार्फत तयार करण्यात येत असलेल्या अशा रॅपिड टेस्टींग कीटस्चा वापर करण्यासही मंजुरी मिळाली आहे. ही बाब लक्षात घेऊन या दोन कंपन्यांचे रॅपिड टेस्टींग कीट खासगी कंपन्या, कॉर्पोरेट हाऊसेस यांनी खरेदी करण्याची पालिकेने सूचना केली आहे. कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या चाचण्या करून घ्याव्यात, अशी सूचनाही महानगरपालिका प्रशासनाने केली आहे. टाळेबंदीच्या शिथिलतेनंतर हळूहळू कामकाज सुरू करताना संसर्गाला आळा घालण्यासाठी ही उपाययोजना महत्त्वाची ठरणार आहे.