महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी सुरू झाल्या ‘वॉर्ड वॉर रूम’..

शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने रुग्णालयात खाट न मिळणे, रुग्णवाहिका वेळेवर न पोहोचणे यासारख्या तक्रारी रोज येत होत्या. त्यावर, उपाय म्हणून मुंबई महापालिकेने आपल्या 24 विभागांमध्ये विकेंद्रित पद्धतीने रुग्णालय खाटा व्यवस्थापन प्रणाली अंमलात आणण्यासाठी 'वॉर्ड वॉर रूम' सुरू केले आहेत. यामुळे रुग्णांना वेळेवर खाटा आणि रुग्णवाहिका सेवा मिळेल अशी अपेक्षा महापालिका प्रशासनाला आहे.

BMC starts Ward War room to help COVID-19 patients
कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी सुरू झाल्या ‘वॉर्ड वॉर रूम’..

By

Published : Jun 12, 2020, 3:30 AM IST

मुंबई - शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने रुग्णालयात खाट न मिळणे, रुग्णवाहिका वेळेवर न पोहोचणे यासारख्या तक्रारी रोज येत होत्या. त्यावर, उपाय म्हणून मुंबई महापालिकेने आपल्या 24 विभागांमध्ये विकेंद्रित पद्धतीने रुग्णालय खाटा व्यवस्थापन प्रणाली अंमलात आणण्यासाठी 'वॉर्ड वॉर रूम' सुरू केले आहेत. यामुळे रुग्णांना वेळेवर खाटा आणि रुग्णवाहिका सेवा मिळेल अशी अपेक्षा महापालिका प्रशासनाला आहे.

मुंबईत रोज हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे मुंबईमधील रुग्णालयात रुग्णांना खाटा उपलब्ध होत नव्हत्या. रुग्णांना खाटा मिळण्यासाठी 10 ते 12 तासांपेक्षा अधिक काळ वाट पहावी लागत होती. तसेच, रुग्णवाहिका मिळण्यासही 5 ते 7 तासांचा कालावधी लागत होता. पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या '1916' या क्रमांकावर फोन करूनही रुग्णांना खाटा मिळत नसल्याने, काही रुग्णांचे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

त्यामुळेच, पालिकेने आता विकेंद्रित पद्धतीने 24 विभाग कार्यालयांच्या स्तरावरून रुग्णांसाठी जलदगतीने खाटा उपलब्ध करून देण्यासाठी नवीन कार्यप्रणाली सुरु केली आहे. यातून कोविड-१९ बाधित रुग्णांना विभाग स्तरावरुनच अधिक जलद, सुलभ व प्रभावीपणे आरोग्य सेवा देण्यास मदत होणार असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. प्रत्येक ‘वॉर्ड वॉर रूम’ मध्ये दिल्या जाणाऱ्या दूरध्वनी क्रमांकाच्या ३० वाहिन्या असतील. २४x७ तत्वावर तीन सत्रांमध्ये अखंडपणे कार्यरत राहणाऱ्या या कक्षामध्ये वैद्यकीय अधिकारी, आणि इतर आवश्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी सुरू झाल्या ‘वॉर्ड वॉर रूम’..

विभागीय नियंत्रण कक्षांचे संपर्क क्रमांक -

  • ए विभाग : २२७० ०००७
  • बी विभाग : २३७५ ९०२३
  • सी विभाग : २२१९ ७३३१
  • डी विभाग : २३८३५००४
  • ई विभाग : २३०० ०१५०
  • एफ/दक्षिण विभाग : २४१७ ७५०७
  • एफ/उत्तर विभाग : २४०११३८०
  • जी/दक्षिण विभाग : २४२१ ९५१५
  • जी/उत्तर विभाग : २४२१ ०४४१
  • एच/पूर्व विभाग : २६६३ ५४००
  • एच/पश्चिम विभाग : २६४४ ०१२१
  • के/पूर्व विभाग : २६८४ ७०००
  • के/पश्चिम विभाग : २६२० ८३८८
  • पी/दक्षिण विभाग : २८७८ ०००८
  • पी/उत्तर विभाग : २८४४ ०००१
  • आर/दक्षिण विभाग : २८०५ ४७८८
  • आर/उत्तर विभाग : २८९४ ७३५०
  • आर/मध्य विभाग : २८९४ ७३६०
  • एल विभाग : २६५० ९९०१
  • एम/पूर्व विभाग : २५५२ ६३०१
  • एम/पश्चिम विभाग : २५२८ ४०००
  • एन विभाग : २१०१ ०२०१
  • एस विभाग : २५९५ ४०००
  • टी विभाग : २५६९ ४०००

हेही वाचा :मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाचे सर्वाधिक बळी; 97 जणांचा मृत्यू तर १,५४० नव्या रुग्णांची नोंद..

ABOUT THE AUTHOR

...view details