मुंबई - विधानभवन, मंत्रालयानंतर कोरोनाचा मुंबई महापालिका मुख्यालयात प्रवेश झाला आहे. मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव ( BMC Standing Committee Chairperson ) कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. ते रुग्णालयात दाखल झाले आहेत.
मुंबईत नुकतेच विधीमंडळ अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात सहभागी होणाऱ्या मंत्री, आमदार, अधिकारी व पत्रकार यांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. तसेच अधिवेशनानंतरही मंत्री, आमदार व खासदार यांनी कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. या चाचणीदरम्यान अनेक मंत्री आणि आमदार कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. विधानभवन व मंत्रालय आदी ठिकाणी कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. तरी मुंबई महापालिका मुख्यालयात कोरोनाचा प्रसार झाला नव्हता. पालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांची प्रकृती ( Yashawant Jadhav tested Corona Positive ) खालावली होती. त्यांना रक्तदाबाचा त्रास आहे. ताप आल्याने त्यांनी आपली कोरोना चाचणी करून घेतली. तेव्हा त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अहवाल पॉझिटिव्ह आल्याने डॉक्टरांच्या सल्लाने यशवंत जाधव हे रुग्णालयात भरती झाले आहे.