महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

5000 बेडच्या रुग्णालयासाठी फक्त एक निविदा; पालिकेकडून 20 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ - Mumbai corona news

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात येणाऱ्या संसर्गजन्य आजाराशी-महामारीशी सामना करण्यासाठी मुंबई महानगर पालिकेकडून पश्चिम उपनगरात 5000 बेडचे कायमस्वरुपी संसर्गजन्य रुग्णालय उभारण्यात येणार आहे. यासाठी 20 एकर जागा संपादित करण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या.

मुंबई संसर्गजन्य रुग्णालय
5000 बेडच्या रुग्णालयासाठी फक्त एक निविदा; पालिकेकडून 20 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

By

Published : Aug 12, 2020, 1:33 PM IST

मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात येणाऱ्या संसर्गजन्य आजाराशी-महामारीशी सामना करण्यासाठी मुंबई महानगर पालिकेकडून पश्चिम उपनगरात 5000 बेडचे कायमस्वरुपी संसर्गजन्य रुग्णालय उभारण्यात येणार आहे. यासाठी 20 एकर जागा संपादित करण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. पण या निविदेला प्रतिसाद मिळाला नाही. फक्त एकच निविदा आल्याने आता निविदेला 20 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती भैय्यासाहेब बेहेरे, उपजिल्हाधिकारी ( लँड) यांनी दिली आहे.

मुंबईत कस्तुरबा हे एकमेव संसर्गजन्य आजारावरील रुग्णालय आहे. त्यामुळेच कोरोनाच्या संकटात आपण महामारीशी सामना करण्यासाठी सक्षम नसल्याचे समोर आले. हीच बाब लक्षात घेता आता राज्य सरकारने पश्चिम उपनगरात 5000 बेडचे कायमस्वरुपी संसर्गजन्य आजाराचे रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार किमान 20 एकर जागा लागणार आहे. तर ही जागा द्रुतगती महामार्गालगत हवी आहे. त्यानुसार जुलैमध्ये पालिकेने जागा संपादनाच्यादृष्टीने निविदा मागवल्या आहेत. 10 ऑगस्टला यासाठीची मदत संपली. मात्र यादरम्यान केवळ एकच निविदा आल्याने आता पालिकेने निविदेला 20 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

हा सरकारचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. असे असताना निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने, जागा मिळवण्यातच अडचणी येत असल्याने पालिकेची चिंता वाढण्याची शक्यता आहे. पण पालिकेने मात्र याला प्रतिसाद न मिळाल्याची बाब फेटाळून लावली आहे. गेल्या 8-10 दिवसात मुंबईत पाऊस झाला, पाणी भरले. या काळात कागदपत्र मिळवणे वा इतर प्रक्रिया पार पाडणे अनेकांना शक्य झाले नाही. त्यामुळे अनेक इच्छुकांनी आमच्याकडे मुदतवाढ मागितली होती. त्यानुसार आम्ही 20 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली असून आता 25 ऑगस्टला निविदा खुल्या होतील. त्यामुळे आता या निविदेला कसा प्रतिसाद मिळतो यावरच या प्रकल्पाचे भवितव्य अवलंबून आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details