मुंबई - मुंबई महापालिकेच्या (BMC Schools) शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण दिले जात नाही असा आरोप सामाजिक संघटना आणि विरोधी पक्षांकडून केला जात होता. यासाठी पालिका शाळा हायटेक करण्याच्या व शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याचा निर्णय पालिकेने घेतला. त्याचाच एक भाग म्हणून इयत्ता दहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ३८ कोटी ७२ लाख रुपयांचे १९ हजार ९५९ टॅबचे वाटप केले जाणार आहे.
BMC will Buy Tab : पालिका शाळांमधील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ३९ कोटींच्या टॅबची खरेदी - बृन्हमुंबई महापालिका
यासाठी पालिका शाळा हायटेक करण्याच्या व शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याचा निर्णय पालिकेने (BMC) घेतला. इयत्ता दहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ३८ कोटी ७२ लाख रुपयांचे १९ हजार ९५९ टॅबचे वाटप केले जाणार आहे.
विद्यार्थ्यांसाठी टॅब खरेदी -
मुंबई महापालिकेचा (BMC) शाळांचा आणि शिक्षणाचा दर्जा घसरला होता. मराठी व इतर भाषेच्या शाळा बंद होऊन इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू झाल्या. त्यामुळे विद्यार्थी संख्या कमी होत होती. विद्यार्थी संख्या टिकवून ठेवण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना शाळेत रोज दप्तर आणण्यास लागू नये म्हणून टॅब द्वारे शिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. पालिकेने दिलेले जुने टॅब खराब झाल्याने, त्यामध्ये नवीन सॉफ्टवेअर अपडेट करता येत नसल्याने, तसेच सर्व्हिसिंगचे कंत्राट संपल्याने दहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी १९ हजार ९९५ टॅब खरेदीसाठी ३८ कोटी ७२ लाख रुपये खर्च केले जाणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.
असा होणार फायदा -
मुंबईत गेले पावणे दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या प्रसारादरम्यान शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. पालिका शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी गरीब आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्मार्टफोन घेऊन देणे आर्थिक परिस्थितीमुळे शक्य होत नाही. पालकांकडे स्मार्टफोन असला तरी ते कामानिमित्त घराबाहेर असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेता येत नाही. यामुळे विद्यार्थ्यांना टॅब दिल्यास त्यांना शाळेत तसेच घरीही ऑनलाईन शिक्षण घेणे शक्य होईल.