महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोरोना: १५ जूनपर्यंत एक लाख खाटा उपलब्ध करण्याची पालिकेची तयारी - 1 lakk bed ready for corona patients

मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि पालिका विविध उपाययोजना करते आहे. वाढत्या रुग्णसंख्येचा अंदाज घेऊन खासगी रूग्णालयांसह विविध ठिकाणी खाटांची व्यवस्था करण्यात येत आहे.

bmc
१५ जूनपर्यंत एक लाख खाटा उपलब्ध करण्याची पालिकेची तयारी

By

Published : May 29, 2020, 7:11 AM IST

मुंबई - कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यासाठी महापालिका सर्व तयारीनिशी सज्ज आहे. येत्या काळात रुग्ण संख्या वाढली तरी त्यासाठी आवश्यक खाटांचे नियोजन करण्यात आले आहे. सध्या मुंबईत ७५ हजार खाटा तयार असून १५ जूनपर्यंत एक लाख खाटा उपलब्ध होतील असे नियोजन केले असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि पालिका विविध उपाययोजना करते आहे. वाढत्या रुग्णसंख्येचा अंदाज घेऊन खासगी रुग्णालयांसह विविध ठिकाणी खाटांची व्यवस्था करण्यात येत आहे. १५ जूनपर्यंत एक लाख खाटा उपलब्ध होतील असे नियोजन केले आहे. कोरोना काळजी केंद्रात ३० हजार खाटा तयार असून डीसीएच-डीसीएचसीमध्ये येत्या ३१ मेपर्यंत १४ हजार खाटा उपलब्ध होणार आहेत. वरळी येथील एनसीआयसीमध्ये ६४० खाटा (४० खाटांचा अतिदक्षता विभाग), महालक्ष्मी रेसकोर्स ३००, बीकेसीत एक हजार, नेस्को गोरेगाव येथे ५३५ अशा एकूण २४७५ खाटा उपलब्ध होतील, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

कोरोना व्हायरसची साखळी तोडण्यासाठी येत्या काळात व्हायरसचा पाठलाग केला जाणार आहे. त्यासाठी काँटॅक्ट ट्रेसिंगवर अधिक भर दिला जाणार आहे. झोपडपट्ट्या आणि प्रतिबंधित क्षेत्रात एक रुग्ण आढळल्यास त्याच्या संपर्कातील पंधरा जणांचे कोरोना काळजी केंद्रात क्वारंटाईन केले जाणार आहे. मुंबईकरांनी घाबरून जाऊ नये मात्र आवश्यक काळजी घ्यावी, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details