मुंबई - जागतिक दर्जाचे शहर असलेल्या मुंबईत रोज हजारो मॅट्रिक टन कचरा निर्माण होतो. या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची हा मोठा प्रश्न असतो. मात्र महापालिकेने आता उच्च न्यायालयाच्या आदेशाने कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. देवनार डम्पिंग ग्राऊंडवर ६०० मेट्रीक टन कचऱ्यावर प्रक्रिया करून विजनिर्मिती केली जाणार आहे. या निर्णयामुळे देवनार डंपिंगवरील कचऱ्याचे प्रमाण व दुर्गंधीचे प्रमाण कायम स्वरूपी संपुष्टात येणार आहे.
मुंबईतील कचरा विल्हेवाटीचा प्रश्न सुटणार, महापालिका करणार कचऱ्यातून वीजनिर्मिती - देवनार डम्पिंग ग्रॉऊंड
मुंबई महापालिकेने कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे योग्य नियोजन केले आहे. देवनार डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्याचा निर्णय महापालिकेने केला आहे. या निर्णयाचे विरोधी पक्षाकडूनही स्वागत करण्यात आले आहे.

कचरा कमी करण्यासाठीच्या उपाययोजना -
मुंबईत रोज नऊ हजार मॅट्रिक टन कचरा निर्माण होत होता. पालिकेने गेल्या काही वर्षांत पुनर्विकास होणाऱ्या इमारती आणि संकुलांना परिसरातच कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे प्रकल्प सुरू करण्याची सक्ती केली आहे. यामुळे नव्याने बांधण्यात येणाऱ्या इमारतींच्या संकुलात गांडूळ खत, कचऱ्याचे वर्गीकरण, ओल्या कचऱ्याची विल्हेवाट असे प्रकल्प राबवण्यात आले. या प्रकल्पामुळे मुंबईतील कचऱ्याचे प्रमाण कमी होऊन सात ते साडेसात मॅटिक टनवर आले आहे. मुंबईमधील कचऱ्याचे प्रमाण कमी झाले असले तरी कचऱ्याचा प्रश्न सुटलेला नाही.