मुंबई - राणा यांच्या घरात अनधिकृत बांधकाम आहे यावर पालिका ( BMC notice to Navneet Rana and Ravi Rana ) ठाम असून, पुढील 15 दिवसांत बांधकाम पाडा नाहीतर आम्ही पाडू, अशी नोटीस पालिकेने राणा ( Navneet Rana house news Mumbai ) दाम्पत्यांना दिली आहे. मात्र, राणा यांनी घराबाबत दिलेले सर्व पुरावे पालिकेला अमान्य आहेत. राणा यांच्या घरात अनधिकृत बांधकाम आहे यावर पालिका ठाम असून, पुढील 15 दिवसांत बांधकाम पाडा नाहीतर आम्ही पाडू, अशी नोटीस पालिकेने ( Unauthorized construction notice to Navneet Rana ) राणा दाम्पत्यांना दिली आहे.
हेही वाचा -Sonu Nigam : सोनू निगमचा पुन्हा एकदा चर्चेत, जुना 'तो' व्हिडिओ पुन्हा होतोय व्हायरल
पालिकेची नोटीस - खार पश्चिम, १४ व्या रस्त्यावर 'लाव्ही' इमारतीत राणा दाम्पत्याचे घर आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी हनुमान चालीसा वाचण्यास जाण्यासाठी हे दाम्पत्य मुंबईत आले तेव्हा याच इमारतीत राहाले होते. या इमारतीत तसेच काही घरांमध्ये मंजूर आराखड्याव्यतिरिक्त अधिक बांधकाम करण्यात आले असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. पालिका नियमांचे उल्लंघन केले असल्याच्या तक्रारीवरून मुंबई महापालिकेने तपासणीसाठी कलम ४८८ नुसार नोटीस पाठवली आहे. राणा हे तुरुंगात असल्याने पालिकेच्या पथकाने त्यांच्य्या घरावर नोटीस बजावली होती. राणा यांच्या घरी पालिकेचे पथक दोन वेळा जाऊन आले. मात्र, ते तुरुंगात असल्याने पालिकेच्या पथकाला त्यांच्या घरात जाता आले नव्हते.