महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 27, 2020, 3:16 PM IST

Updated : Nov 27, 2020, 3:24 PM IST

ETV Bharat / city

एका 'नटी'साठी वेगळा न्याय का? कंगना प्रकरणावर महापौरांचा सवाल

कंगना रणौत हिच्या मालमत्तेवर मुंबई महापालिकेकडून करण्यात आलेल्या तोडक कारवाई विरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. महापालिकेला कंगनास नुकसान भरपाईचे आदेश दिले आहेत. मात्र, यावर निकाची प्रत पाहून निर्णय घेऊ, कोर्टाकडून नटीसाठी वेगळा न्याय दिला असल्याची प्रतिक्रिया महापौैर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

bmc vs kangaana
महापौैर किशोरी पेडणेकर

मुंबई - मुंबई महापालिकेने अभिनेत्री कंगना रणौत हिच्या कार्यालयावर केलेल्या तोडक कारवाई विरोधात न्यायालयाने आदेश देत नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना एका 'नटी'साठी न्यायालयाने असे आदेश दिल्याने मुंबईकर अचंबित झाले आहेत. एका 'नटी'ला वेगळा न्याय आणि सामान्य मुंबईकरांना वेगळा न्याय का? असा प्रश्न उपस्थित करत या निर्णयाची प्रत आल्यावर त्यावर विचार विनिमय करून योग्य तो निर्णय घेतला जाईल. तसेच काही राजकीय पक्षांनी कोर्टालाही राजकीय आखाडा बनवला आहे, अशी प्रतिक्रिया मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

कंगना रणौत या अभिनेत्रीने मुंबईबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर पालिकेने वांद्रे पालिहील येथील मणिकर्णिका फिल्म्सचे घरात बनवलेल्या कार्यलयात बेकादेशीर बांधकाम झाल्याप्रकरणी नोटीस बजावून तोडकाम केले होते. त्याविरोधात कंगनाने उच्च न्यायालयात घेतली. याप्रकरणी पालिकेने केलेली कारवाई सूडबुद्धीने केल्याचे म्हणत नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. त्यावर महापौर बोलत होत्या.

कंगना प्रकरणावर महापौरांचा सवाल
नटीसाठी वेगळा न्याय -

यावेळी बोलताना ३५४ (अ) ची नोटीस पालिकेने पहिल्यांदाच दिलेली नाही. याआधीही अनेकांना ही नोटीस दिली आहे. त्यावेळीही नोटीस दिलेले लोक कोर्टात गेले. त्याप्रकरणी कोर्टाने मुंबई महापालिकेच्या कायद्याप्रमाणे कारवाई करावी, असे आदेश दिले आहेत. आज जो काही निकाल आला आहे हा एका 'नटी'साठी आला आहे. 'नटी'ला वेगळा न्याय आणि मुंबईकर नागरिकांना वेगळा न्याय हे यावरून दिसत आहे. आम्ही संविधान मानणारे लोक आहोत. कोर्टाचा आम्हाला आदर आहे. कोर्टाने जो निकाल दिला आहे, त्याची प्रत अजून आमच्यापर्यंत पोहोचलेली नाही. निकालाची प्रत आल्यावर पालिका कुठे कमी पडली का, यापुढे काय भूमिका घ्यावी यावर कायदा विभाग आणि आयुक्त यांच्याशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असेही महापौरांनी सांगितले.

मुंबईकर अचंबित -

बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी पालिकेने ३५४ (अ) ची नोटीस दिल्यावर अनेकजण कोर्टात गेले आहेत. त्यावेळी कोर्टाने मुंबई महापालिकेच्या नियमाप्रमाणे कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. कंगनाच्या प्रकरणात नुकसान भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यावरून सामान्य मुंबईकरांना एक न्याय आणि एका नटीला एक न्याय असे यावरून दिसत आहे. याप्रकरणी जो निकाल दिला आहे, त्यावरून मुंबईकर अचंबित झाले असून या प्रकरणात जो निकाल दिला आहे, त्याचा फायदा मुंबई आणि महाराष्ट्रातील नागरिकांनाही पुढे होईल, असेही महापौरांनी म्हटले आहे.

काय आहे प्रकरण -
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतच्या मुंबईतील पाली हिल स्थित कार्यालयावर मुंबई महानगरपालिकेने अतिक्रमण संदर्भात कारवाई केली होती. याविरोधात कंगनाने मुंबई महानगरपालिकेकडे दोन कोटी रुपयांची नुकसान भरपाई मागितली होती. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर सुनावणी झाली. मुंबई महानगरपालिकेतून या याचिकेवर प्रतिज्ञापत्र सादर करताना म्हणण्यात आले होते की कंगनाच्या कार्यालयावर करण्यात आलेली कारवाई योग्य असून तिने दाखल केलेली याचिका ही फेटाळून लावण्यात यावी. कंगनाने मागितलेली नुकसान भरपाई म्हणजे कायद्यासोबत झालेले गैरवर्तन असल्याचही मुंबई महानगरपालिकेने म्हटले होते.

पालिकेने काय म्हटले होते -

मुंबई महानगरपालिकेचे वकील ज्वेल कार्लोस यांनी महानगरपालिकेतर्फे युक्तिवाद करताना मुंबई उच्च न्यायालयात म्हटलं होते की कंगनाने केलेले आरोप हे चुकीचे असून तिच्या कार्यालयात करण्यात आलेली कारवाई ही कायद्याच्या चौकटीत राहून करण्यात आली आहे. या कार्यालयाचे रुटीन निरीक्षण करत असताना महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना या कार्यालयांमध्ये अनधिकृतपणे बांधकाम झाल्याचे आढळले होते. यामुळे कंगनाला रीतसर नोटीस देऊन हे बांधकाम पाडण्यात आले आहे. या इमारतीच्या पार्किंगच्या जागेत टॉयलेट बनवण्यात आले होते आणि टॉयलेटच्या ठिकाणी किचन बनवण्यात आले होते, अशी मुंबई महानगरपालिकेतर्फे मुंबई उच्च न्यायालयाला माहिती देण्यात आलेली आहे.

सूडबुद्धीने कारवाई केल्याचा कंगनाचा दावा -

अभिनेत्री कंगनाने तिच्या वकिलांकडून न्यायालयात काही पुरावे सादर केले होते. कंगनाने सोशल मीडियावर काही विषयांवर टीकाटिप्पणी केल्यानंतर यासंदर्भात तिला पालिकेकडून नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, बॉलिवूडमधला फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यालाही अशाच प्रकारची नोटीस बजावल्यानंतर त्याला नोटीसला उत्तर देण्यासाठी एक महिन्याचा वेळ देण्यात आला होता. मात्र, कंगनाला देण्यात आलेल्या नोटीसला उत्तर देण्यासाठी केवळ 24 तासांचा अवधी दिल्यामुळे ही कारवाई सुडबुद्धीने झाल्याचा दावा अभिनेत्री कंगना राणौतने मुंबई उच्च न्यायालयात केला होता.

२ कोटींचा नुकसानभरपाईचा दावा

महापालिकेने तोडक कारवाई केल्यानंतर कंगणाने ही कारवाई बेकायदा असल्याचे सांगत नुकसान भरपाई मागितली होती. तिने महानगरपालिकेकडून २ कोटींची मागणी केली होती. तर, कंगनाने कार्यालय रहिवासी भागात येत असल्याने आणि चुकीच्या पद्धतीने नुतनीकरण करून बांधले असल्याचा ठपका महापालिकेने ठेवला होता.

निकालावर कंगनाची प्रतिक्रिया -
जेव्हा एखादी व्यक्ती सरकारच्या विरोधात उभी राहते आणि जिंकते तेव्हा तो केवळ एका व्यक्तीचा विजय नव्हे तर लोकशाहीचा विजय आहे. ज्याने मला धैर्य दिले त्या प्रत्येकाचे आभार कंगनाने मानले. तसेच ज्यांनी माझ्या तुटलेल्या स्वप्नांचा उपहास केला त्यांचेही आभार, असे ट्विट तिने केले आहे.

Last Updated : Nov 27, 2020, 3:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details