मुंबई - मुंबईतील कानडी शाळांना देण्यात येणार अनुदान राज्य शासनाने आणि महापालिकेने बंद करावे, या मागणीसाठी शिवसेना नगरसेवकांनी विभागप्रमुख व महापौर यांच्या नावे पत्र लिहावे, असं जाहीर विधान मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे. आज लालबाग येथे नगरसेवक आशिष चेंबूरकर यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले, त्यावेळी महापौर बोलत होत्या.
कानडी लोकांच्या इथे नाड्या आवळल्या तरच कर्नाटकच्या सरकारला कळेल. बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकाळात हटाव लुंगी बजाव पुंगी आंदोलन करण्यात आलं होतं, त्याप्रमाणे पुन्हा पुंगी वाजवण्याचे दिवस आलेले आहेत, असेही त्या पेडणेकर म्हणाल्या.