मुंबई : बोरिवली (पश्चिम) मधील चिकूवाडीतील ओसाड जागेचे रुपांतर पाम उद्यान आणि सुगंधी उद्यानात करुन नंदनवन फुलवण्याची किमया महापालिकेच्या उद्यान विभागाने करुन दाखवल्याने या परिसराचे रुप पालटले आहे. कधीकाळी निर्मनुष्य भासणारा हा परिसर आता उद्यानांमध्ये येणाऱया आबालवृद्धांमुळे फुलून जातो. विशेष म्हणजे, या दोन्ही उद्यानांमध्ये असणाऱया शोषखड्डयांमुळे रिंगवेलद्वारे उपलब्ध होणारे पाणी उद्यानातील सिंचनासाठीच पुनर्वापरात येते. परिणामी दररोज सुमारे ३० ते ४० हजार लीटर पाण्याची बचत करण्याची किमया देखील या उद्यानांनी साध्य केली आहे अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली.
बोरिवलीत ओसाड जागेचे नंदनवनात रुपांतर, महापालिकेच्या उद्यान विभागाची किमया - chikuwadi garden in boriwali
चिकूवाडीतील ओसाड जागेचे रुपांतर पाम उद्यान आणि सुगंधी उद्यानात करुन नंदनवन फुलवण्याची किमया महापालिकेच्या उद्यान विभागाने करुन दाखवल्याने या परिसराचे रुप पालटले आहे. कधीकाळी निर्मनुष्य भासणारा हा परिसर आता उद्यानांमध्ये येणाऱया आबालवृद्धांमुळे फुलून जातो.
५ एकर क्षेत्रफळाचा ओसाड भूखंड
बोरिवली (पश्चिम) मधील चिकूवाडी येथे वसंत संकूल मागील परिसरात, मनोरंजन मैदानासाठी आरक्षित असलेला सुमारे ५ एकर क्षेत्रफळाचा भूखंड सन २०१३ मध्ये महानगरपालिकेच्या ताब्यात आला. त्यावेळी ही जागा ओसाड स्वरुपाची व काहीशी दुर्लक्षितच होती. या भूखंडांच्या बाजूने एक मोठा नाला देखील वाहतो. स्वाभाविकच सदर परिसराच्या भौगोलिक विकासाला चालना मिळत नव्हती. त्यामुळेच हा परिसर काहीसा निर्मनुष्य होता. यावर उपाय म्हणून महानगरपालिका प्रशासनाने मनोरंजन मैदानासाठी आरक्षित या जागेवर उद्यान विभागाच्या माध्यमातून संकल्पीय उद्यानाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतल्याचे परदेशी यांनी सांगितले.
हेही वाचा -राणीच्या बागेत पेंग्विनच्या दुसऱ्या पिढीचा जन्म; महापौर किशोरी पेडणेकरांची माहिती