मुंबई - मुंबई महापालिकेने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना एक नोटीस बजावली आहे. त्यात जुहू येथील अधीश बंगल्यातील अनधिकृत बांधकाम 15 दिवसांत ( Juhu Bungalow Illegal Alterations ) हटवावे. अन्यथा त्यावर पालिकेतर्फे कारवाई करण्यात येईल, असे नमूद करण्यात आले ( BMC Issue Notice Narayan Rane ) आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीपूर्वी नारायण राणे आणि शिवसेनेत वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा
मुंबई महापालिकेच्या के-पश्चिम वॉर्ड (अंधेरी पश्चिम) च्या अधिकाऱ्यांनी नारायण राणे यांच्या जुहू तारा रोड येथील अधीश बंगल्यात फेब्रुवारी महिन्यात जाऊन मोजमाप केले होते. त्यात राणे यांनी बंगल्यात बेकायदेशीर बदल केल्याचे समोर आले आहे. त्यानुसार पालिकेने राणे यांना नुकतीच 351 कलमानुसार नोटीस दिली होती. या नोटीसीत बांधकाम करताना दिलेल्या प्लॅनमध्ये बदल करण्यात आले आहेत. पार्किंग, बेसमेंट आणि स्टोर रूमच्या जागेत रहिवाशी बांधकाम करण्यात आले आहे.