महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Vaccination for children : लहान मुलांच्या लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी ‘हर घर दस्तक’ मोहीम - हर घर दस्तक मोहीम

मुंबई महापालिकेने (BMC) लहान मुलांच्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाला गती देण्यासाठी विशेषतः १२ ते १४ आणि १५ ते १७ वर्ष वयोगटातील मुला-मुलींचे लसीकरणाचे (Vaccination of Small Children) प्रमाण वाढवण्यासाठी मुंबईत केंद्र शासनाच्या निर्देशानुसार ‘हर घर दस्तक’ ही मोहीम (Every Home Vaccination) दिनांक १ जून २०२२ पासून सुरू केली आहे.

Vaccination Campaign For Children
लहान मुलांचे लसीकरण मोहीम

By

Published : Jun 4, 2022, 3:42 PM IST

मुंबई : मुंबई महापालिकेने कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाला गती देण्यासाठी विशेषतः १२ ते १४ आणि १५ ते १७ वर्ष वयोगटातील मुला-मुलींचे लसीकरणाचे प्रमाण वाढवण्यासाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार ‘हर घर दस्तक’ ही मोहीम दिनांक १ जून २०२२ पासून सुरू केली आहे. दिनांक ३१ जुलै २०२२ पर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे.

लहान मुलांच्या लसीकरणाला अल्प प्रतिसाद : केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात दिनांक १६ जानेवारी २०२१ पासून कोविड-१९ विषाणू प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू करण्यात आले आहे. या अंतर्गत १८ वर्ष वयावरील सर्व पात्र नागरिकांचे पहिल्या मात्रेचे ११२ टक्के व दुसर्‍या मात्रेचे १०१ टक्के लसीकरण पूर्ण करण्यात आलेले आहे. दिनांक ३ जानेवारी २०२२ पासून १५ ते १७ वर्ष वयोगटातील लाभार्थ्‍यांचे तसेच दिनांक १६ मार्च २०२२ रोजी पासून १२ वर्ष ते १४ वर्ष वयोगटातील लाभार्थ्‍यांचे कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण करण्‍यात येत आहे.

केंद्रांची संख्या पुढीलप्रमाणे : महानगरपालिका व शासकीय रुग्णालयात १०७, खासगी रुग्णालयात १२५ अशी एकूण २३२ कोविड-१९ लसीकरण केंद्रे कार्यन्वित आहेत. १२ ते १४ वयोगटातील लाभार्थ्‍यांचे पहिल्या मात्रेचे २८ टक्के व दुसर्‍या मात्रेचे १२ टक्के लसीकरण झाले आहे. तर १५ ते १७ वयोगटातील लाभार्थ्‍यांचे पहिल्या मात्रेचे ५७ टक्के व दुसर्‍या मात्रेचे ४५ टक्के लसीकरण झालेले आहे. थोडक्यात, १८ वर्षांवरील पात्र नागरिकांच्या तुलनेत १२ ते १७ या वयोगटातील लसीकरण हे अत्यंत कमी प्रमाणात झाले आहे.


“हर घर दस्तक मोहीम २” : कोविड संसर्गाच्या चौथ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता, कोविड लसीकरण गतिमान करण्यासाठी आणि सामाजिक प्रतिकार क्षमता निर्माण करण्यासाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात दिनांक १ जून, २०२२ ते ३१ जुलै २०२२ पर्यंत “हर घर दस्तक मोहीम २” राबविण्यात येत आहे. यामध्ये १२ ते १४ वर्ष व १५ ते १७ वयोगटातील सर्व मुलांचे प्राधान्याने लसीकरण करण्यात येणार आहे.


अशी राबवली जाणार मोहीम :या मोहिमेत महानगरपालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन भेटी देण्यात येत आहेत. या भेटीआधारे १२ ते १४ आणि १५ ते १७ वयोगटातील पहिली व दुसरी मात्रा न घेतलेली मुले तसेच प्रतिबंधात्मक मात्रा न घेतलेले ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक यांच्या याद्या तयार करण्यात येत आहेत. लस घेण्यासाठी घराजवळच्या लसीकरण केंद्रावर जाण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यात येईल.

मोहिमेची माहितीसाठी माध्यमांचा वापर : विभाग पातळीवरील शाळा व महाविद्यालयात विशेष लसीकरण सत्रे आयोजित करण्यात येणार आहेत. त्यासाठी संबंधित शिक्षण संस्थांसोबत महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी समन्वय साधत आहेत. लसीकरणाला वेग देण्यासाठी विविध समाज माध्यमांचादेखील उपयोग करण्यात येत आहे. मुंबईतील सर्व नागरिकांनी आपले व पात्र पाल्यांचेदेखील लसीकरण पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगर) डॉ. संजीव कुमार यांनी केले आहे.

हेही वाचा : मुंबईत पुढील आठवड्यापासून वॉर्डनुसार लसीकरण सुरू होण्याची शक्यता

ABOUT THE AUTHOR

...view details