महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Adv. Gunratna Sadavarte : अॅड. गुणरत्न सदावर्ते राहत असलेली इमारत बेकायदेशीर, पालिकेची सदावर्ते यांच्यासह इमारतीला नोटीस - अनधिकृत बांधकाम

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनादरम्यान राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या घरावर हल्ला झाला होता. या हल्ल्या प्रकरणी अटकेत असलेले अॅड. गुणरत्न सदावर्ते ( Adv. Gunratna Sadavarte ) राहत असलेल्या परळ येथील क्रिस्टल टॉवर इमारतीला पालिकेने ओसी ( Occupation Certificate ) दिलेली नाही. सदावर्ते राहत असलेले घर बेकायदेशीर आहे. हे बेकायदेशीर बांधकाम हटवले जात नाही तोपर्यंत त्या इमारतीला ओसी दिली जाणार नसल्याचे पालिकेने म्हटले आहे. यामुळे इमारतीमधील सर्व रहिवाशांना अनधिकृत रहिवासी घोषित केले आहे. यामुळे सदावर्ते यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र

By

Published : Apr 20, 2022, 7:21 PM IST

मुंबई- एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनादरम्यान राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या घरावर हल्ला झाला होता. या हल्ल्या प्रकरणी अटकेत असलेले अॅड. गुणरत्न सदावर्ते ( Adv. Gunratna Sadavarte ) राहत असलेल्या परळ येथील क्रिस्टल टॉवर इमारतीला पालिकेने ओसी ( Occupation Certificate ) दिलेली नाही. सदावर्ते राहत असलेले घर बेकायदेशीर आहे. हे बेकायदेशीर बांधकाम हटवले जात नाही तोपर्यंत त्या इमारतीला ओसी दिली जाणार नसल्याचे पालिकेने म्हटले आहे. यामुळे इमारतीमधील सर्व रहिवाशांना अनधिकृत रहिवासी घोषित केले आहे. यामुळे सदावर्ते यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

सदावर्ते राहत असलेले घर अनधिकृत -दादर हिंदमाता येथे जुन्या इमारतीचा पुनर्विकास करून रजाक सुपारीवाला या बिल्डरने क्रिस्टल टॉवर ( Crystal Tower Building ) ही बहुमजली इमारत बांधली आणि त्यामधील घरे विकली. याच इमारतीमध्ये अॅड. गुणरत्न सदावर्ते राहतात. क्रिस्टल टॉवरला 2018 मध्ये लागलेल्या आगीत चार जणांचा बळी गेला होता तर काही जण जखमी झाले होते. त्या दुर्घटनेनंतर या इमारतीला महापालिकेची ओसी मिळाली नसल्याची माहिती समोर आली. इमारतीच्या मूळ आराखड्यात आयत्यावेळी बदल करून तो आराखडा इमारत प्रस्तावाकडे मंजुरीसाठी पाठवल्याने इमारत प्रस्ताव विभागाने इमारतीला ओसी नाकारली होती. दरम्यान, ओसी मिळाली नसली तरी इमारतीमधील रहिवाशांना पाणी, विजेसारख्या मूलभूत सुविधा पुरवल्या जात आहेत. अनधिकृत रहिवाशी असल्याने त्यांच्याकडून नियमाप्रमाणे दुप्पट रक्कम दंड म्हणून आकारण्यात येत आहे. दरम्यान, सदावर्ते यांच्या घरासह सर्व रहिवाशांना अनधिकृत रहिवासी घोषित केले असून नियमाप्रमाणे इमारत प्रस्ताव विभागाकडून सर्वांना 353 (ए) अन्वये दोनदा नोटीस पाठवण्यात आली ( BMC ) आहे.

हेल्थ सेंटरमध्ये सदावर्ते यांचे घर -गुणरत्न सदावर्ते राहत असलेल्या 16 व्या मजल्यावरील 1601 नंबरचे घर हे मूळ इमारत आराखड्यात फिटनेस सेंटर ( Fitness Center ) म्हणून दाखवण्यात आलेले आहे. मात्र, बिल्डरने त्यात बदल करून ते सदावर्ते यांना विकले आहे. याबाबत सदावर्ते यांना 347 (ए) नुसार नोटीस बजावण्यात आली आहे. इमारतीमधील हे सर्वात मोठे अनधिकृत बांधकाम आहे. ते तोडत नाही तोपर्यंत इमारतीला ओसी मिळणार नाही, असेही इमारत प्रस्ताव विभागाने स्पष्ट केले आहे.

...तरच ओसी मिळेल -क्रिस्टल टॉवरला आजही ओसी मिळालेली नाही. इमारतीला ओसी हवी असेल तर बिल्डर आणि आर्किटेक्टने इमारतीमधील अनधिकृत बांधकामे तोडून टाकावीत आणि सुधारित आराखडा इमारत प्रस्ताव विभागाकडे पाठवला तर इमारतीला ओसी मिळेल. यामुळे रहिवाशांना दिलासा मिळेल, अशी माहिती महापालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागाने दिली.

हेही वाचा -Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते यांचा मुक्काम आता कोल्हापुरात.. ताबा देण्यास न्यायालयाची परवानगी

ABOUT THE AUTHOR

...view details